संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:27 AM2021-08-14T04:27:44+5:302021-08-14T04:27:44+5:30
शिरोळ : येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात बेशिस्तपणे वाहने लावली जात आहेत. त्यामुळे याठिकाणी कामानिमित्त येणाºया पक्षकारांना मार्ग ...
शिरोळ : येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात बेशिस्तपणे वाहने लावली जात आहेत. त्यामुळे याठिकाणी कामानिमित्त येणाºया पक्षकारांना मार्ग शोधावा लागत आहे. त्यामुळे बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनांना शिस्त लावण्याची गरज आहे.
---------------
भटक्या कुत्र्यांची दहशत
कुरुंदवाड : येथील शिवतीर्थ चौक ते बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची झुंड असते. त्यामुळे दुचाकी तसेच पादचारी नागरिक जीव मुठीत घेऊन ये-जा करत आहेत. दुचाकी वाहनांच्या पाठीमागे कुत्र्यांचा पाठलाग होत असून अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
-------------------
अवजड वाहनांना बंदी करा
शिरोळ : शहरातून जाणाऱ्या प्रमुख मार्गावरून अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अवजड वाहनांना शहरातून जाण्यास बंदी करण्यात यावी, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.