संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:25 AM2021-08-23T04:25:28+5:302021-08-23T04:25:28+5:30
दत्तवाड : येथील श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्या आहेत. सायली अर्जुन ...
दत्तवाड : येथील श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्या आहेत. सायली अर्जुन धुमाळे व स्वरांजली शशिकांत रजपूत या दोन विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना या परीक्षेत यशस्वी होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यांना बाह्य परीक्षा विभाग प्रमुख एस. जे. पाटील, बी. बी. सावळवाडे यांचे मार्गदर्शन, तर मुख्याध्यापक संजय तावदारे यांच्यासह पालकांचे प्रोत्साहन मिळाले.
फोटो - २२०८२०२१-जेएवाय-०५-सायली धुमाळे व स्वरांजली रजपूत
-------------
उदगाव टेक्निकलच्या विद्यार्थ्यांचे यश
उदगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत उदगाव (ता. शिरोळ) येथील डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. ११ विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये अपेक्षा कांबळे ही गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्तीधारक ठरली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा अध्यक्ष गणपतराव पाटील, महादेव राजमाने, बाळासो कोळी, मुख्याध्यापक एस. एस. जंगम, आर. एम. मोरे, ए. पी. कोकतरे यांचे मार्गदर्शन लाभले.
---------------------
जयसिंगपुरात बेशिस्त पार्किंग
जयसिंगपूर : शहरात बेशिस्त पार्किंगचा प्रश्न वारंवार समोर येत आहे. बेशिस्त लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. दवाखाने, विविध संस्था यासह पानटपऱ्यांसमोर वाहनांची मोठी वर्दळ असते. याच ठिकाणी बेशिस्त वाहने लावल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.