संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:25 AM2021-08-26T04:25:04+5:302021-08-26T04:25:04+5:30

इचलकरंजी : वृद्ध कलावंतांचे थकीत पेन्शन केंद्राने त्वरित द्यावे, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे उपाध्यक्ष शाहीर ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

Next

इचलकरंजी : वृद्ध कलावंतांचे थकीत पेन्शन केंद्राने त्वरित द्यावे, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे उपाध्यक्ष शाहीर विजय जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिले आहे. सर्व वृद्ध कलाकार या पेन्शन रकमेतून आरोग्यविषयक व इतर आनुषंगिक खर्च करीत असतात; परंतु गेल्या वर्षापासून पेन्शन मिळालेले नाही. तरी सदरची थकीत पेन्शनची रक्कम त्वरित द्यावी, असे म्हटले आहे

.

प्रा. मधुमती शिंदे यांना एक्सलन्स अवॉर्ड

इचलकरंजी : प्रा. डॉ. मधुमती शिंदे यांना राज्यस्तरीय भारतज्योती प्रतिभासन्मान एक्सलन्स अवॉर्ड मिळाले. येथील दत्ताजीराव कदम आर्टस्, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभागात त्या प्राध्यापक म्हणून काम करतात.

महिला सोशल फाउंडेशनची स्थापना

इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथे रणरागिणी महिला सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य शाखेची स्थापना केली. महिलांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारणे या उद्देशाने या शाखेची उभारणी केल्याचे प्रतिपादन संदीप कुडचीकर यांनी केले.

जयवंत महाविद्यालयात व्याख्यान

इचलकरंजी : जयवंत महाविद्यालयात ‘भारतीय गणराज्यापुढील आव्हाने’ या विषयावर प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांचे ऑनलाइन व्याख्यान झाले. डॉ. प्रकाश पाटील यांनी शेतकरी, कामगार, बेरोजगार युवकांच्या समस्या ही गणराज्यापुढील आव्हाने असल्याने समाजमन अस्वस्थ बनले आहे, असे मत व्यक्त केले.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.