संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:23 AM2021-04-20T04:23:56+5:302021-04-20T04:23:56+5:30
इचलकरंजी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येथील भगवान महावीर जयंती महोत्सव रद्द करण्यात आला आहे. सध्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेता ...
इचलकरंजी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येथील भगवान महावीर जयंती महोत्सव रद्द करण्यात आला आहे. सध्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेता भगवान महावीर जयंती उत्सव मंडळाने विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सर्वांनी आपापल्या घरीच भगवान महावीर यांची जयंती साजरी करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.
........
उपमुख्य कार्यकारी यांची भेट
कबनूर : येथील ग्रामपंचायत कार्यालयास उपमुख्य कार्यकारी मनीषा देसाई यांनी भेट दिली. कोरोना उपाययोजनांसदर्भात देसाई यांनी माहिती घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच शोभा पवार, उपसरपंच उत्तम पाटील, ग्रामविकास अधिकारी बी.टी. कुंभार, आदी उपस्थित होते.
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विविध शासकीय विभागांत ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती दर्शवली आहे. त्यामुळे विविध ठिकाणी संबंधित अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांना तेथून परत जावे लागत आहे. एका कामासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
..............
आठवडी बाजार पुन्हा भरला
इचलकरंजी : शहापूर (ता. हातकणंगले) येथील आठवडी बाजार पुन्हा भरला आहे. याठिकाणी व्यावसायिकांसह नागरिकही खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. दरम्यान, आज, मंगळवारी होत असलेल्या शहापूर यात्रेनिमित्त खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने फिरत आहेत.