संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:23 AM2021-04-21T04:23:40+5:302021-04-21T04:23:40+5:30
बुबनाळ : नृसिंहवाडी- औरवाड पुलावरून अवैध बेकायदेशीर वाळू वाहतूक मध्यरात्री सुरू आहे. काही वाळूतस्कर, अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांच्या संगनमताने वाळूतस्करी ...
बुबनाळ : नृसिंहवाडी- औरवाड पुलावरून अवैध बेकायदेशीर वाळू वाहतूक मध्यरात्री सुरू आहे. काही वाळूतस्कर, अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांच्या संगनमताने वाळूतस्करी सुरू असल्याचे बोलले जात आहे. पर्यावरण विभागाने वाळूउपशाला बंदी घातली असतानादेखील औरवाड परिसरात वाळू नेमकी येते कुठून याचा शोध महसूल विभागाने घ्यावा, अशी मागणी होत आहे.
------------------------
कुरुंदवाड पुलाच्या कठड्याची दुरवस्था
बुबनाळ : कुरुंदवाड- नृसिंहवाडी दिनकरराव यादव पुलाचा कटड्याची दुरवस्था झाल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असले तरी कठडा खराब झाल्याने रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरक्षित कठडा बसवावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
--------------------
खवा उत्पादक अडचणीत
बुबनाळ : लॉकडाऊनमुळे खवा, मिठाई मार्केट पूर्णपणे बंद झाल्याने खवा उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. कवठेगुलंद, आलास, गणेशवाडी, औरवाड यासह परिसरातील खवा नृसिंहवाडी, कोल्हापूरसह बाजारपेठेत जातो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिठाई दुकानदारांनी खवा घेण्यास नकार दिल्याने खवा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.