संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:20 AM2021-04-26T04:20:42+5:302021-04-26T04:20:42+5:30
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील कुंजवनमधील कोरोना सेंटर फुल्ल झाले आहे. रुग्णांची दाखल होणारी संख्या लक्षात घेता दोन ...
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील कुंजवनमधील कोरोना सेंटर फुल्ल झाले आहे. रुग्णांची दाखल होणारी संख्या लक्षात घेता दोन दिवसांपूर्वी २५ बेड वाढविण्यात आले होते. सध्याचे सव्वाशे बेड कमी पडत असल्याने रविवारी कुंजवनमधील शाळेत नव्याने ३० बेडची व्यवस्था करण्यात आली. याठिकाणी १५५ बेडचे सर्व सुविधांयुक्त कोरोना सेंटर कोरोना रुग्णांसाठी आधार ठरणार आहे.
............
चिंचवाडमध्ये दारू विक्री
उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथे बेकायदेशीपणे दारूची विक्री होत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अन्य गावांतील दारूची दुकाने बंद आहेत. मात्र, चिंचवाड येथे दुप्पट दराने दारू विक्री जोमात सुरू आहे. त्यामुळे शिरोळ पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मद्यपींची दारू अड्डयावर मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. ग्राम समिती देखील कोणतीच कारवाई करीत नसल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.
------------------
प्लास्टिकचा वापर थांबवा
जयसिंगपूर : शहरामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर पुन्हा वाढला आहे. बाजारामध्ये काही विक्रेत्यांकडून सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. एकीकडे बंदी असताना दुसरीकडे त्याचा वापर सुरू झाल्यामुळे पालिका प्रशासनाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.