संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:26 AM2021-04-28T04:26:47+5:302021-04-28T04:26:47+5:30

इचलकरंजी : येथील लायन्स क्लबने कोरोना योद्धे या विषयावर ऑनलाईन चारोळी स्पर्धा आयोजित केली आहे. डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पोलीस, ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

Next

इचलकरंजी : येथील लायन्स क्लबने कोरोना योद्धे या विषयावर ऑनलाईन चारोळी स्पर्धा आयोजित केली आहे. डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पोलीस, आर्मी, सफाई कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून नागरिकांसाठी दिवस-रात्र अविरतपणे काम करीत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे. ही चारोळी ३० एप्रिलपर्यंत पाठवायची आहे. अधिक माहितीसाठी लायन्स क्लबशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

.........

ऑनलाईन स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन

अब्दुललाट : गुरुकुल शिक्षण समूहातर्फे यंदा इयत्ता अकरावी सायन्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन केले आहे. ही परीक्षा २ मेला दुपारी १२ वाजता घेतली जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश नायकुडे व अकॅडमीचे संचालक वेंकटरंगा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.