संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:25 AM2021-05-08T04:25:52+5:302021-05-08T04:25:52+5:30
संक्षिप्त बातम्या रस्त्यावर गर्दीच गर्दी जयसिंगपूर : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रस्त्यावरील गर्दी कमी होताना दिसत नाही. बाजारात ...
संक्षिप्त बातम्या
रस्त्यावर गर्दीच गर्दी
जयसिंगपूर : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रस्त्यावरील गर्दी कमी होताना दिसत नाही. बाजारात सकाळी सात ते अकरा या वेळेत खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र पाहावयास मिळते. तर खासगी लॅबमध्ये कोरोना तपासणीसाठी येणाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग नसल्यामुळे संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कारवाईची मोहीम राबविण्याची गरज आहे.
----------------
योग्य नियोजनाची गरज
शिरोळ : शहरातील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठी गर्दी दिसून येत आहे. पेन्शनधारक पेन्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी पोलीस व पालिका प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
----------------------
ग्रामस्थांनी सहकार्य करावे : पाटील
कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथे कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीकडून वारंवार नियमाबाबत आवाहन केले जात आहे. ग्रामस्थांनीही कोविडच्या नियमांचे पालन करुन ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच सुरगोंडा पाटील यांनी केले आहे.