थोडक्यात बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:23 AM2021-05-11T04:23:30+5:302021-05-11T04:23:30+5:30
गडहिंग्लज : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस गडहिंग्लजला स्वाभिमान दिन म्हणून साजरा करण्यात आला. ...
गडहिंग्लज : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस गडहिंग्लजला स्वाभिमान दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांना अल्पोपाहार देण्यात आला. यावेळी पक्ष कार्यालयात सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले.
यावेळी जिल्हा सचिव सुरेश थरकार, जिल्हा कोषाध्यक्ष रूपाली कांबळे, तालुकाध्यक्ष अर्जुन दुंडगेकर, उपाध्यक्ष महादेव खातेदार, सुनील कांबळे, विजय शिरगावकर, नागेश शिंगे, प्रीती कांबळे, सचिन कांबळे, बसप्रभू कांबळे, सुभाष कांबळे, ज्ञानराजा चिघळीकर, आदी उपस्थित होते.
-------------------------
२) बेळगुंदीत अमर पोवार यांचा सत्कार
गडहिंग्लज : बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) येथील अमर पोवार यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल आजी-माजी सैनिक संघटनेतर्फे माजी सैनिक सदाशिव कानडे यांच्या हस्ते पोवार यांचा सत्कार झाला. यावेळी रवींद्र मगदूम, मनोहर देवेकर, भीमगोंडा पाटील, सदाशिव पाटील, महादेव लोहार, श्रीपती पाटील, निवृत्ती मगदूम, आदी उपस्थित होते. सुरेश पाडले यांनी सूत्रसंचालन केले. विक्रांत पाटील यांनी आभार मानले.
-------------------------
३) ऐनापुरात पाणीपुरवठा योजनेच्या कामास प्रारंभ
गडहिंग्लज : ऐनापूर येथील मंगाईदवी वसाहतीमधील नळपाणी पुरवठा योजनेच्या कामास प्रारंभ करण्यात आला. दलित वस्ती नवबौद्ध व अनुसूचित जाती विकास योजनेंतर्गत या कामास मंजुरी मिळाली आहे. यावेळी सरपंच उषा मांगले, उपसरपंच ईश्वर देसाई, ग्रा. पं. सदस्य लहू दड्डीकर, धोंडिबा कांबळे, किरण कुराडे, सूर्याजी मोहिते, रमेश होडगे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.