संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:43+5:302021-06-16T04:32:43+5:30
इचलकरंजी : येथील सुदर्शन युवक मंडळ व मारवाडी युवा मंचच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी ...
इचलकरंजी : येथील सुदर्शन युवक मंडळ व मारवाडी युवा मंचच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी शिबिराचे उद्घाटन केले. या वेळी नगराध्यक्षा अलका स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. १२८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, संजय केंगार, अनिल डाळ्या आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी नीलेश आमणे, रामसागर पोटे, पुरुषोत्तम चीतलांगिया, द्वारकाधीश चांडक यांनी परिश्रम घेतले.
स्मशानभूमीस मदत
इचलकरंजी : येथील घडशी समाज महासंघाने पंचगंगा स्मशानभूमीसाठी स्टिलचे बकेट व सुपली या वस्तू दिल्या. विवाह कार्यावेळी वाद्य वाजविण्याचे काम घडशी समाज करीत असतो. या वेळी सचिन जाधव, नागेश भोसले, नीलेश पोवार, हरीष धुमाळ, गजानन जाधव आदी उपस्थित होते.
साने गुरुजी यांना अभिवादन
इचलकरंजी : आंतरभारती विद्यालयात साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. डी. एम. देसाई यांनी प्रतिमा पूजन केले. आर. बी. परीट यांनी साने गुरुजींच्या जीवनकार्याची माहिती दिली. ए. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. एस. ए. उत्तूरकर यांनी आभार मानले.
(सुधारित) पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण
इंगळी : पंचायत समितीच्या निधीतून पूर्ण झालेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी केले. अण्णा भाऊ साठेनगरात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या खराब झाल्याने कमी दाबाचा पाणीपुरवठा होत होता. मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या नळांचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले. या वेळी पं. स. सदस्या वैजयंती आंबी, सरपंच शालन पाटील, उपसरपंच विठ्ठल गाताडे, अनिल पाटील, बाळासाहेब नायकवडे आदी उपस्थित होते.