संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:22 AM2021-05-22T04:22:26+5:302021-05-22T04:22:26+5:30
इचलकरंजी : येथील वॉर्ड क्रं. २४ मध्ये पालिकेकडून आरोग्य सुविधेकडे दुर्लक्ष होत आहे. भागात वेळीच लक्ष देऊन नागरी ...
इचलकरंजी : येथील वॉर्ड क्रं. २४ मध्ये पालिकेकडून आरोग्य सुविधेकडे दुर्लक्ष होत आहे. भागात वेळीच लक्ष देऊन नागरी सुविधा पुरवाव्यात; अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन शिवसेनेच्यावतीने आंदोलन छेडू, असा इशारा शहरप्रमुख सयाजी चव्हाण यांनी आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांना दिला.
वस्त्रनगरी दानशूरांची नगरी : गायकवाड
इचलकरंजी : शहराला वस्त्रनगरीबरोबरच दानशूरांची नगरी म्हणून ओळखले जाते. प्रत्येक संकटकाळात शहरातील मुस्लिम समाज मदत कार्यासाठी हिरीरीने पुढे येतो. त्यामुळे इचलकरंजीत काम करण्याची आम्हाला संधी मिळाली याचा आम्हाला गर्व असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले. समस्त मुस्लिम समाजाने आयजीएम हॉस्पिटलमधील कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक व पोलिसांच्या दहा दिवसाची एकवेळच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे. त्याच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, अजीज खान, कैश बागवान, गजेंद्र लोहार, विकास अडसूळ उपस्थित होते.
नगरसेविकेकडून औषध फवारणी
इचलकरंजी : येथील प्रभाग क्रमांक २६ मध्ये नगरसेविका सायली लायकर यांनी औषध फवारणी करून घेतली. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने परिसरात ही औषध फवारणी करण्यात आली. याकामी दत्तात्रय कित्तुरे, पप्पू पाटील, श्रीशैल कित्तुरे, रणजित सावंत, बजरंग हावळ यांचे सहकार्य लाभले.