संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:22 AM2021-05-22T04:22:28+5:302021-05-22T04:22:28+5:30
इचलकरंजी : तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणची मोठी हानी झाली आहे. तेथील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी येथील महावितरणकडून दोन ...
इचलकरंजी : तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणची मोठी हानी झाली आहे. तेथील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी येथील महावितरणकडून दोन पथके रवाना झाली आहेत. महावितरण कार्यालयातील दोन आपत्ती व्यवस्थापन पथके सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली भागात काम करणार असून, कार्यकारी अभियंता सोमाण्णा कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन्ही पथके रवाना झाली आहेत.
देशी भारतीय पद्धतीची झाडे लावा
इचलकरंजी : शहरात देशी भारतीय पद्धतीची झाडे लावावीत, अशा मागणीचे निवेदन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल व नगराध्यक्षा अलका स्वामी यांना दिले. निवेदनात, जलद वाढण्याच्या हेतूने झाडांचे वृक्षारोपण वाढले आहे. त्यामुळे वड, पिंपळ, चिंच, कडूलिंब या प्रकारची भारतीय पद्धतीची झाडे लावावीत, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात गजानन महाजन, उत्तम सातपुते, आनंदा मकोटे, प्रदीप कांबळे, राहुल तेलसिंगे, आदींचा समावेश होता.
कुष्ठरोगी वसाहतीमध्ये भोजन व्यवस्था
इचलकरंजी : लक्ष्मी व्यंकटेश्वर ट्रस्टने कुष्ठरोगी वसाहतीमध्ये भोजन व्यवस्था केली आहे. लॉकडाऊन काळात कुष्ठरोग्यांची अडचण लक्षात घेऊन ही भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. ३१ मेपर्यंत वसाहतीतील नागरिकांना मोफत जेवण वाटप करण्यात येणार आहे. यासाठी अभय यळरुटे, दीपक निंगुडगेकर, पंकज कोठारी, मनीष मुनोत, शीतल मगदूम हे परिश्रम घेत आहेत.