संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:39+5:302021-06-02T04:19:39+5:30
इचलकरंजी : येथील डीकेटीईमधील प्रा. सतीश लवटे यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरअंतर्गत पीएच.डी. इन टेक्स्टाइल ही पदवी मिळाली. त्यांनी 'स्टडीज ...
इचलकरंजी : येथील डीकेटीईमधील प्रा. सतीश लवटे यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरअंतर्गत पीएच.डी. इन टेक्स्टाइल ही पदवी मिळाली. त्यांनी 'स्टडीज आॅन अॅण्ड फॅब्रिक्स फ्रॉम बांबू फायबर्स अॅण्ड इटस ब्लेडस' या विषयावर प्रबंध सादर केला आहे. लवटे यांना प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी
०१०६२०२१-आयसीएच-०१-सतीश लवटे
सेवानिवृत्तनिमित्त सेवागौरव समारंभ
इ
चलकरंजी : येथील डीकेएएससी महाविद्यालयामधील प्रा. एम. बी. सुरपुसे, बी. डी. कदम व अशोक पाटील यांच्या सेवानिवृत्तनिमित्त सेवागौरव समारंभ झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे होते. प्रा. पी. एस. आवटे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. विश्वंभर कुलकर्णी, डॉ. डी. सी. कांबळे, डॉ. डी. जी. घोडके आदी उपस्थित होते.
आधार संस्थेस पीपीई किट
इचलकरंजी : येथील मुस्लिम समाजातील कोरोनाबाधित मृताच्या दफनविधीसाठी आधार संस्थेस प्रत्येकवेळी दहा पीपीई किट देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय उपनगराध्यक्ष तानाजी पोवार घेतला. दफनविधीसाठी सुरक्षेच्यादृष्टीने पीपीई किट महत्त्वाची असल्याची मागणी नगरसेवक लतीफ गैबान यांनी केली होती.