संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:38+5:302021-06-03T04:17:38+5:30

अर्जुनवाड : येथील केंद्रीय जल आयोगाचे एन .जी. इप्पेरी व आर. आर. कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी अभियंता ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

Next

अर्जुनवाड : येथील केंद्रीय जल आयोगाचे एन .जी. इप्पेरी व आर. आर. कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी अभियंता रुपेश यादव होते. यावेळी राजू गायकवाड, भीमराव कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक एम.बी. कांबळे तर सूत्रसंचालन उध्दव मगदूम यांनी केले. याप्रसंगी धोंडीराम गायकवाड, रावसाहेब माने, राजू गावडे, वामन गायकवाड, राजू जाधव, गणपती रणदिवे उपस्थित होते.

-----------------------

मुख्याध्यापकपदी अजित खवाटे

अर्जुनवाड : शिरटी (ता. शिरोळ) येथील हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी अजित खवाटे यांनी निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी रावसाहेब खवाटे, भाऊसो सूर्यवंशी, महावीर चौगुले, सूर्यकांत उदगांवे, आण्णासो सुतार उपस्थित होते.

फोटो - ०२०६२०२१-जेएवाय-०२-अजित खवाटे

--------------------------

उन्हामुळे नागरिक हैराण

शिरोळ : तालुक्यात मंगळवारी रात्री ठिकठिकाणी पाऊस झाला. यामुळे परिसरात गारवा निर्माण झाला होता. मात्र, पुन्हा बुधवारी दिवसभर कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. हवेमध्ये प्रचंड उष्मा जाणवत होता. या उन्हामुळे दुपारच्या सत्रात अनेक जणांनी घराबाहेर जाणे टाळले.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.