थोडक्यात बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:39+5:302021-06-03T04:18:39+5:30

संकेश्वर : प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हुक्केरी तालुक्यातील कोरोनाची साथ नियंत्रणात आहे, असे प्रतिपादन खासदार आण्णासाहेब ज्वोले यांनी केले. येथे अंगणवाडी ...

Brief news | थोडक्यात बातम्या

थोडक्यात बातम्या

Next

संकेश्वर : प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हुक्केरी तालुक्यातील कोरोनाची साथ नियंत्रणात आहे, असे प्रतिपादन खासदार आण्णासाहेब ज्वोले यांनी केले.

येथे अंगणवाडी सेविकांना वैद्यकीय साहित्याचे किट वाटपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अन्न व नागरी पुरवठामंत्री उमेश कत्ती होते. बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार हावळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नगराध्यक्षा सीमा हतनुरे, तहसीलदार डी. एच. हुगार, नगरसेवक उपस्थित होते.

--------------------------

२) संकेश्वर येथे मोफत नाष्टा

संकेश्वर : सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी येथील बालरोगतज्ज्ञ व नगरसेवक डॉ. मंदार हावळ यांनी मोफत नाष्टा व चहाची सोय केली आहे. या कामी जयप्रकाश सावंत, प्रभाकर कांबळे यांचेही त्यांना सहकार्य लाभले आहे.

--------------------------

३) मुख्याध्यापक गडकरी यांचा सत्कार

गडहिंग्लज : मलिग्रे हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत गडकरी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सदानंद जंगम यांच्या हस्ते सत्कार झाला. अध्यक्षस्थानी शंकरराव पाटील होते. यावेळी प्राचार्य इंद्रजित पाटील यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

--------------------------

४) चंदगडला कोरोना सेंटरचे लोकार्पण

गडहिंग्लज : चंदगड येथील अंजुमन-ए-इस्लामतर्फे सुरू करण्यात आलेल्या लोकनेते बाबासाहेब कुपेकर कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. नगराध्यक्षा प्राची काणेकर, प्रांताधिकारी विजया पांगारकर, संग्राम कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कामी अल्ताफ मदार, सल्लाउद्दीन नाईकवाडे, शब्बीर बेपारी, अल्लाऊद्दीन सय्यद, नियाज मदार, मोहसीन पटेकरी, अरीफ खेडेकर, खलीलअहमद अल्लाखान, सलीम नाईकवाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, सभापती अ‍ॅड. अनंत कांबळे, तहसीलदार विनोद रणावरे, मुख्याधिकारी अभिजित जगताप, सचिन बल्लाळ, डॉ. राजेंद्र खोत, आदी उपस्थित होते. झाकीर नाईक यांनी स्वागत केले. तजमुल फणीबंद यांनी आभार मानले.

--------------------------

५) खमलेहट्टी ग्रामस्थांची पालिकेला मदत

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे कोरोना मृतांवर करण्यात येणाऱ्या अंत्यसंस्कारांसाठी खमलेहट्टी ग्रामस्थांनी दोन ट्रॉली लाकूड व तीन हजार शेणींची मदत केली. यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, बाबूराव चौगुले, शंकर सुतार, मारुती राणे, बसवराज माने, ईरगोंडा पाटील, नवीन माने, बाबासाहेब माने, मनोहर बिरंजे, श्रीशैल चौगुले, सुरेश जाधव, संभाजी घेवडे, आदी उपस्थित होते.

-------------------------

६) चंदगडला रुग्णांना मोफत जेवण

गडहिंग्लज : चंदगडचे नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांच्याकडून कोविड काळजी केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांना एकवेळचे जेवण मोफत दिले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.