संक्षिप्त वृत्त-जिल्हाधिकारी कार्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:25 AM2020-12-29T04:25:06+5:302020-12-29T04:25:06+5:30
कोल्हापूर : थकीत वाहन कराअभावी व खटला विभागाच्या केसीससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहने अडकवून ठेवली आहेत. अशा वाहन मालकांनी ...
कोल्हापूर : थकीत वाहन कराअभावी व खटला विभागाच्या केसीससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहने अडकवून ठेवली आहेत. अशा वाहन मालकांनी कर व दंड भरून आपली वाहने ताब्यात घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी केले आहे.
वाहन मालकांना वारंवार नोटीस पाठवूनही अद्याप ज्यांनी कर व दंड भरून आपले वाहन ताब्यात घेतले नाही, त्यांनी आपल्या वाहनाबाबतचा कर व दंड ११ जानेवारीपूर्वी भरून वाहन ताब्यात घ्यावे. अन्यथा १२ जानेवारीला दुपारी १२ वाजता या वाहनांचा ई लिलाव केला जाईल, असेही त्यांनी कळवले आहे.
---
ऑनलाईन मार्गदर्शन सत्र
कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत गुरुवारी ( दि. ३१) सकाळी दहा वाजता ‘तयारी यशस्वी करिअरची’ या विषयावर केमिकल इंजिनिअर चेतन रेगे, लेखक व वक्ते निलेश काजळे व आयटी क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ (मुंबई) यांच्या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
---
गगनगडावरील दत्त जयंती रद्द
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गगनबावडा तालुक्यातील गगनगडावर आज, मंगळवारी होणारा दत्त जयंती उत्सव रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती गगनबावडा तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
----