संक्षिप्त वृत्त- जिल्हाधिकारी कार्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:37+5:302021-07-10T04:17:37+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर व पन्हाळ्यातील सैनिकी मुलांचे वसतिगृह व महासैनिक दरबार हॉल व लॉनसाठी तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक ...
कोल्हापूर : कोल्हापूर व पन्हाळ्यातील सैनिकी मुलांचे वसतिगृह व महासैनिक दरबार हॉल व लॉनसाठी तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक व पहारेकरी पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुकांनी १४ तारखेपर्यंत आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रदीप ढोले यांनी केले आहे. .
ही पदे कंत्राटी पद्धतीने व एकत्रित मानधनावर असून माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.
---
योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक हणमंत बिरादार यांनी केले आहे.
महामंडळामार्फत २० टक्के बीजभांडवल योजना आणि व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत. २० टक्के बीजभांडवल योजनेत ७५५ टक्के कर्ज बँकेचे २० टक्के महामंडळाचे व ५ टक्के लाभार्थी सहभाग राहील. ऑफलाईन योजनेअंतर्गत कर्ज मागणी अर्ज मिळण्यासाठी संबंधितांनी जिल्हा कार्यालयाशी व ऑनलाईन योजनेंतर्गत www.msobcfde.org या संकेतस्थळाला भेट द्यावी अधिक माहितीसाठी महामंडळाचे कोल्हापूर जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, ताराराणी चौक, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.
--