संक्षिप्त वृत्त जिल्हाधिकारी कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:22 AM2020-12-23T04:22:22+5:302020-12-23T04:22:22+5:30
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत मॅट्रिकोत्तर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती ...
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत मॅट्रिकोत्तर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांनी सोयी सुविधांसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण या कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी केले.
अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांची महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा या योजनांच्या लाभासाठी ३ डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी mahadbtmahait.gov.in या वेब लिंकचा वापर करावा, असे आवाहनही सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी केले आहे.
---
परिवहन कार्यालयातर्फे उद्या शिबिर
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मुरगूड व गडहिंग्लज या तालुक्यांतील नागरिकांच्या मागणीनुसार रविवार व सोमवारी जादाची पक्की अनुज्ञप्ती विषयक शिबिर कार्यालय आयोजित करण्यात येत आहे. तालुक्याच्या ठिकाणासाठी गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून शिबिर व स्लॉट सोडण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनी वेळ घ्यावी, असे आवाहन कार्यालयाने केले आहे.
जनतेच्या सोयीसाठी शिबिर कार्यालयात अपॉइटमेंट घेण्यासाठी एकसूत्रता यावी यासाठी हा उपक्रम घेण्यात येत आहे.
--
इंदुमती गणेश