संक्षिप्त वृत्त - जिल्हाधिकारी कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:16 AM2021-02-05T07:16:06+5:302021-02-05T07:16:06+5:30

कोल्हापूर : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करवीर तालुक्यातील दोन प्रशिक्षण संस्थांना निवडपत्र देऊन ...

Brief News - Collector's Office | संक्षिप्त वृत्त - जिल्हाधिकारी कार्यालय

संक्षिप्त वृत्त - जिल्हाधिकारी कार्यालय

googlenewsNext

कोल्हापूर : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करवीर तालुक्यातील दोन प्रशिक्षण संस्थांना निवडपत्र देऊन करण्यात आला.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करावयाची असून, जिल्ह्यातील बेरोजगार व गरजू उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी स्मार्ट पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण शिक्षण संस्थांची निवड करण्यात आली आहे.

---

‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ या नावीन्यपूर्ण योजनेत

दहा उत्कृष्ट उद्योग संकल्पनाची निवड

कोल्हापूर : ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ या नावीन्यपूर्ण योजनेतील दहा उत्कृष्ट उद्योग संकल्पनाची निवड करण्यात येऊन दहा महिला बचतगटांना पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

ही योजना जिल्हाधिकारी, जिल्हा नावीन्यता जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन, कौशल्य विकास विभाग व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या माध्यमातून राबविण्यात येते. जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी तालुकास्तरावर निवड झालेल्या १२० महिला बचतगटांना उत्कृष्ट संकल्पना सादरीकरणासाठी कळविले होते. त्यापैकी उपस्थित शंभर महिला बचतगटांच्या सादरीकरणातून जिल्हास्तरीय परीक्षक निवड समितीकडून १० उत्कृष्ट उद्योग संकल्पनांची निवड करण्यात येऊन त्यांना प्रत्येकी दोन लाखप्रमाणे २० लाख संबंधित महिला बचतगटांच्या बँक खात्यावर पायाभूत सुविधाबाबतच्या अर्थसाहाय्याची रक्कम आरटीजीएसने जमा करण्यात आली आहे.

Web Title: Brief News - Collector's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.