संक्षिप्त वृत्त-सांस्कृतिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:28 AM2021-01-16T04:28:09+5:302021-01-16T04:28:09+5:30

कोल्हापूर : संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार या अभियानांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ...

Brief news-cultural | संक्षिप्त वृत्त-सांस्कृतिक

संक्षिप्त वृत्त-सांस्कृतिक

Next

कोल्हापूर : संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार या अभियानांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या विद्यमाने उद्या, रविवारी कृषी विभाग कार्यालय येथे सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत आठवडी बाजार भरविण्यात येणार आहे.

बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव, ग्राहकाला ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध व्हावा यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढील प्रत्येक रविवारी हा बाजार भरणार असून यासाठी माल उपलब्ध करून देण्याचे तसेच ग्राहकांना ताजा भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

--

स्वयंसिद्धा संस्थेस देणगी

कोल्हापूर : महिलांना आर्थिक स्वावलंबी बनविणाऱ्या स्वयंसिद्धा संस्थेला ब्रिगेडिअर उदय थोरात व त्यांच्या पत्नी श्रईलेखा थोरात यांनी एक लाखाची देणगी दिली. यावेळी संचालिका कांचन परूळेकर यांनी या देणगीचा प्रत्येक पैसा सत्कारणी लागेल, याची ग्वाही दिली.

कोरोनामुळे सात महिने संस्थेचे प्रशिक्षण बंद ठेवावे लागले. या आपत्तीकाळात संस्थेला अर्थसहाय्याची गरज भासणार याची जाणीव ठेवून थोरात दाम्पत्याने ही देणगी दिली.

--

बालकल्याणमधील विद्यार्थ्यांसाठी वह्या

कोल्हापूर :कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारती विद्यापीठच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्यावतीने बालकल्याण संकुलमधील विद्यार्थांसाठी वह्या देण्यात आल्या. संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर यांनी या वह्या स्वीकारल्या.

यावेळी इन्स्टिट्यूटचे प्रा. डॉ. रवींद्र मराठे, संगणक विभागप्रमुख डॉ. के. एम. अलास्कर, डॉ. आर.डी. जाधव, ए. टी. गायकवाड, इंद्रजित देसाई, वैशाली पाटील, ब्रम्हदेव तवर, आनंदा आलेकरी उपस्थित होते.

--

अवनितर्फे शिक्षिकांची कार्यशाळा

कोल्हापूर : अवनि संस्थेतर्फे डे केअर सेंटरमधील शिक्षिकांची दोन दिवसीय कार्यशाळा हणबरवाडी येथील नवीन बालसंकुल येथे झाली.

यावेळी असिपा अपराध व पूजा प्रभावळे यांनी टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे, अभिनयाद्वारे मुलांना बडबड गीते कशी शिकवावीत, गंमतीशीर प्रयोग कसे घ्यावेत याबद्दल मार्गदर्शन केले. उपाध्यक्षा अनुराधा भोसले यांनी बालक-पालक संघटनेची बांधणी कशी करावी हे सांगितले. प्रताप पाटील यांनी बालकांचा विकास यावर मार्गदर्शन केले. साताप्पा मोहिते यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राधिका लोखंडे, वैशाली कोळी उपस्थित होत्या. अमर कांबळे यांनी आभार मानले.

--

कपिल नाळे यांची निवड

कोल्हापूर : भ्रष्टाचारविरोधी जनशक्तीच्या कोल्हापूर शहर कार्याध्यक्षपदी जुना बुधवार पेठ येथील कार्यकर्ते कपिल कृष्णात नाळे यांची निवड झाली. निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष नितीन जगताप इंदापूर यांच्या मान्यतेने प्रशांत खाडे, जिल्हाध्यक्ष सुशील भांदिगरे, साताप्पा कांबळे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

--

फोटो नं १५०१२०२१-कोल-कपिल नाळे (निवड)

--

Web Title: Brief news-cultural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.