संक्षिप्त बातम्या गडहिंग्लज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:20 AM2021-01-02T04:20:03+5:302021-01-02T04:20:03+5:30

पेरणोली : चांदेवाडी (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती कोंडुसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच प्रभाकर कुंभार अध्यक्षस्थानी ...

Brief News Gadhinglaj | संक्षिप्त बातम्या गडहिंग्लज

संक्षिप्त बातम्या गडहिंग्लज

Next

पेरणोली : चांदेवाडी (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती कोंडुसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच प्रभाकर कुंभार अध्यक्षस्थानी होते. बाबूराव सावरतकर यांनी मुदत संपल्याने आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. यावेळी ग्रामसेविका प्रियांका भापकर, विजय कोंडूसकर, शिवराज जाधव आदी उपस्थित होते.

- २) गडहिंग्लजमध्ये विश्वशांतीसाठी प्रार्थना

गडहिंग्लज : नाताळ सणानिमित्त येथील चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी व आम्ही गडहिंग्लजकर संघटनेतर्फे विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. फादर ज्यो मंथेरो यांनी प्रभू येशूच्या जन्माची कहाणी व त्या घटनेचा आध्यात्मिक व वैश्विक संदर्भ विशद केला.

यावेळी, जे. वाय. बारदेस्कर, अरविंद बारदेस्कर, रफिक पटेल, साताप्पा कांबळे, महेश सलवादे, रमजान अत्तार, नागेश चौगुले, सुभाष पाटील, महेश आरभावी, सचिन मेहता, डॉ. एम. एस. बेळगुद्री, आशपाक मकानदार आदी उपस्थित होते.

-- ३) पालिका कर्मचाऱ्यांना भेटवस्तू वाटप

चंदगड : कोरोना काळात जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या येथील दैनंदिन स्वच्छता, पाणीपुरवठा व आरोग्य विभागातील नगरपंचायतीकडील सर्व कर्मचाऱ्यांना डॉ. देवकुमार सूर्यवंशी यांनी भेटवस्तू देऊन गौरव केला. यावेळी कर्मचारी अध्यक्ष संतोष कडूकर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

४) अरळगुंडीत सप्ताह उत्साहात

हलकर्णी : अरळगुंडी (ता. गडहिंग्लज) येथे श्री विठ्ठल नाम सप्ताह उत्साहात पार पडला. श्री हनुमंतास अभिषेक घालून गाथा, ध्वज व प्रतिमापूजन, काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन व कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.

५) शिंदे हायस्कूलमध्ये संयुक्त कार्यक्रम

गडहिंग्लज : शहरातील सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गणेवश वाटप असा संयुक्त कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी डॉ. सुहास मेंगाणे होते. यावेळी राजवर्धन रणजित शिंदे या अष्टपैलू विद्यार्थिनीचा व आर. बी. माने यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण, जे. एम. भदरगे, के. ए. पुजारी, आर. बी. शिंत्रे आदी उपस्थित होते.

--------------------------------------

६) मुगळीच्या उपसरपंचपदी आरबोळे बिनविरोध

गडहिंग्लज : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रियांका भिमा आरबोळे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच बी. जी. स्वामी होते. उपसरपंचपदी आरबोळे यांचे नाव आण्णासाहेब चौगुले यांनी सुचविले, त्यास चंद्रकांत भोसले यांनी अनुमोदन दिले. यावेळी ग्रामसेविका साधना गवळी, तृप्ती वाघ, रूपा धुळाज, रमेश आरबोळे, राजू चौगुले, चंद्रकांत माने, विनायक कोकितकर, दुंडाप्पा धुळाज, चंद्रकांत भोसले आदी उपस्थित होते.

* प्रियंका आरबोळे : ३११२२००२-गड-०१

-----------------------------------------

Web Title: Brief News Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.