संक्षिप्त बातम्या इचलकरंजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:42 AM2021-02-06T04:42:45+5:302021-02-06T04:42:45+5:30

इचलकरंजी : दी न्यू हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता आठवीसाठी सुरू असलेल्या एनएमएमएस कार्यशाळेचा सांगता समारंभ झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुणराव ...

Brief News Ichalkaranji | संक्षिप्त बातम्या इचलकरंजी

संक्षिप्त बातम्या इचलकरंजी

googlenewsNext

इचलकरंजी : दी न्यू हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता आठवीसाठी सुरू असलेल्या एनएमएमएस कार्यशाळेचा सांगता समारंभ झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुणराव खंजिरे होते. यावेळी डी.बी. टारे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत आर.एस. पाटील यांनी व मुख्याध्यापक एस.ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. सूत्रसंचालन एस.एम. आंबेकर यांनी केले, तर एस.एस. पाटील यांनी आभार मानले.

कबनूर हायस्कूलचे यश कबनूर : ऑनलाइन प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये कबनूर हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या स्पर्धा रोटरी क्लब इचलकरंजीने आयोजित केल्या होत्या. स्पर्धेत श्रुतिका जयकुमार केटकाळे व रजत संजय नरंदेकर या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बी.बी. मगदूम, एस.एन. पाटील, जी.जी. लंबे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Brief News Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.