संक्षिप्त बातम्या इचलकरंजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:16 AM2021-06-19T04:16:12+5:302021-06-19T04:16:12+5:30
इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांचे कोरोना प्रतिबंध लसीकरण तातडीने करावे, अशा मागणीचे निवेदन दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी ...
इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांचे कोरोना प्रतिबंध लसीकरण तातडीने करावे, अशा मागणीचे निवेदन दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. निवेदनात, यंत्रमाग कामगारांची संख्या ४५ हजार इतकी आहे. यापैकी बहुतांश कामगार लसीकरणापासून वंचित आहेत. तरी त्यांचे लवकरात लवकर लसीकरण करावे, असे म्हटले आहे.
रुई-इंगळी बंधा-यावरील पाणी पात्राबाहेर
इंगळी : येथील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली असून, रुई-इंगळी बंधा-यावर पाणी पातळी ६१ फुटांवर पोहचली आहे. पाणी मोठ्या प्रमाणात पात्राबाहेर पडल्याने शेतजमिनी पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली आहे. शेतीमध्ये असलेले जनावरांचे तळ हलवून शेतकरी जनावरांना सुरक्षितस्थळी स्थलांकरीत आहे.
खरिपाच्या पेरणीस सुरुवात
इंगळी : दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात खरिपाच्या पेरणीस सुरुवात झाली आहे. मात्र, बहुतांश भागातील शेतजमिनींमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने शेतक-यांना पेरण्या करणे मुश्कील झाले आहे. परिणामी पावसाअभावी थांबलेल्या पेरण्या आता अतिपावसामुळे थांबल्या आहेत.