संक्षिप्त बातम्या जयसिंगपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:19 AM2021-01-02T04:19:59+5:302021-01-02T04:19:59+5:30

आय. यु. मोमीन यांचा सत्कार अर्जुनवाड : केंद्रीय जल आयोगाच्या अर्जुनवाड केंद्राचे निरीक्षक आय. यु. मोमीन यांचा सेवानिवृत्तीनिमित्त ...

Brief News Jaisingpur | संक्षिप्त बातम्या जयसिंगपूर

संक्षिप्त बातम्या जयसिंगपूर

Next

आय. यु. मोमीन यांचा सत्कार

अर्जुनवाड : केंद्रीय जल आयोगाच्या अर्जुनवाड केंद्राचे निरीक्षक आय. यु. मोमीन यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आर. के. पायनावर होते. यावेळी कनिष्ठ अभियंता रुपेश कुमार यादव, रफिक शेख, वसंत कोळी, मनोजकुमार रणदिवे, विशाल इंगळे उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. एम. गुटकुळ यांनी केले, तर उध्दव मगदूम यांनी आभार मानले.

--------------------

अर्जुनवाडमध्ये पुरस्कारांचे वितरण

अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील घोडगिरी बिरदेव मंदिरात श्री हालमत संप्रदाय मंडळ कुपवाड सांगली यांच्यावतीने धनगर संस्कृती संवर्धन पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अठरावे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी रामचंद्र डांगे होते. यावेळी बबन थोरात यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. तसेच बाळासाहेब मंगसुळे, दत्ता पुजारी, पांडुरंग माने, रायाप्पा सोमुते, जक्कण्णा मिसी, कामना व्हनमाने, शांताराम पाटील यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

----------------

घोसरवाड-हेरवाड रस्ता डांबरीकरण करा

दत्तवाड : घोसरवाड-हेरवाड जमादार मळ्याकडे जाणारा रस्ता रुंदीकरण करून डांबरीकरण करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. वीस वर्षांपूर्वी घोसरवाड मराठी शाळा ते जमादार मळा हेरवाड असा रस्ता झाला होता. त्यावेळी डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर अद्याप त्या रस्त्यावर डांबरीकरण झाले नसल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. सध्या ऊस वाहतूक सुरू असल्याने कुरुंदवाडकडे जाण्याचा जवळचा रस्ता म्हणून याच रस्त्याचा वापर होतो. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Brief News Jaisingpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.