संक्षिप्त वृत्त कोल्हापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:23 AM2021-03-05T04:23:09+5:302021-03-05T04:23:09+5:30
बिंदू चौकातील नाईट कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्सच्यावतीने सर्टिफिकेट कोर्स इन म्युझिक (सुगम संगीत व्होकल अभ्यासक्रम) हा सहा महिन्यांचा ...
बिंदू चौकातील नाईट कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्सच्यावतीने सर्टिफिकेट कोर्स इन म्युझिक (सुगम संगीत व्होकल अभ्यासक्रम) हा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. १६ मार्च ते १६ सप्टेंबरदरम्यान, सायंकाळी ६ ते ७ असा कोर्सचा कालावधी असून, सातवी पास शैक्षणिक अर्हता आहे. १२ मार्चपर्यंत संपर्क साधवा, असे आवाहन नाईट कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्सचे प्र. प्राचार्य सुरेश फराकटे यांनी केले आहे.
स. म. लोहिया हायस्कूलमध्ये विज्ञान दिन उत्साहात
कोल्हापूर : स. म. लोहिया हायस्कूलमध्ये विज्ञान दिन उत्साहात झाला. मुख्याध्यापक एस. एस. चव्हाण, सुपरवायझर आर. आय. पवार, आर. जी. देशपांडे, विज्ञान विभागप्रमुख एस. एस. जांभळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विज्ञान शिक्षक आर. डी. कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अयुष गोसावी यांनी केले. स्वराज मोरबाळे, श्रीहरी गोसावी, अथर्व पटेल, अभिषेक कंरजे, हर्षवर्धन पाटील, समर्थ पाटील, सोमेश कुंभार यांनी सहभाग घेतला.
कमला कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन
ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्यावतीने विविध वाङ्मयीन उपक्रमांचे आयोजन केले होते. मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वि. वा. शिरवाडकर नाट्य विशेषांकाचे तसेच क्रांतिवीर रंगरावदादा पाटील ग्रंथालयाच्यावतीने ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्याहस्ते झाले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. वर्षा मौंदर्गी, डॉ. सुजय पाटील, उर्मिला कदम, प्रा. सुमती साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.
डी. डी. शिंदे कॉलेजमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रम
कथाकथन, मराठी हस्ताक्षर स्पर्धा आणि ‘मराठी भाषेचे महत्त्व’ या विषयावरील व्याख्यान असे कार्यक्रम घेऊन डी. डी. शिंदे सरकार कॉलेजमध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. पी.आर. शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा माधुरी शिंदे, प्रथमेश शिंदे प्रा. स्वाती तोरस्कर, दीक्षा पाटील आदी उपस्थित होते.
सौरभ पाटील यांची निवड
कोल्हापूर : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युवक कोल्हापूर शहर उपाध्यक्षपदी सौरभ संजय पाटील यांची निवड झाली. निवडीवेळी राहुल सोनटक्के, दावित भोरे, बापू पोवार, योगेश दावणे उपस्थित होते.
ना. पा. हायस्कूलमध्ये विज्ञान दिन उत्साहात
रंकाळा वेश येथील नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये विज्ञान दिन उत्साहात झाला. मुख्याध्यापक एस. आर. गुरव, पर्यवेक्षक एस. डी. पुजारी, मराठी शाखेचे मुख्याध्यापक पी. जी. बामणे यांच्याहस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विज्ञान विभागाचे एस. ए. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष आर. ए. पाटणकर, पी. जी. गावडे, एन. एल. ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.
गझलेतून मानवीवृत्ती, भावना समजतात : प्रसाद कुलकर्णी
कोल्हापूर : गझलेला प्राचीन इतिहास असून, त्याला स्वत:चे आकृतीबंध आहेत. जो दुसऱ्यांचे दु:ख चांगल्याप्रकारे समजू शकतो, तोच लिहू शिकतो. गझलेतून मानवीवृत्ती, भावना समजतात, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी केले. मराठी भाषा दिनानिमित्त करवीरनगर वाचन मंदिर येथील गझल कार्यशाळेत ते बोलत हाेते. संस्कारभारती आणि करवीर नगर वाचन मंदिर यांनी याचे आयोजन केले होते. दुसऱ्या सत्रात श्रीराम पचिंद्रे यांनी गझल सहजसाध्य गोष्ट नाही. गझल लिहिणारा उत्तम कवी असतो, असे सांगितले. यावेळी अरुण सुणगार, नरहर कुलकर्णी, सारिका पाटील, डॉ. सुनंदा शेळके, डॉ. संजीवनी तोफखाने यांनी गझल सादर केल्या.