संक्षिप्त न्यूज कोल्हापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:42 AM2021-03-13T04:42:20+5:302021-03-13T04:42:20+5:30

कोल्हापूर : भटक्या विमुक्तांच्या विविध मागण्यांकरिता २३ मोर्च रोजी आयोजित केलेली भटक्या विमुक्तांचे सामाजिक न्याय हक्क परिषद रद्द करण्यात ...

Brief News Kolhapur | संक्षिप्त न्यूज कोल्हापूर

संक्षिप्त न्यूज कोल्हापूर

googlenewsNext

कोल्हापूर : भटक्या विमुक्तांच्या विविध मागण्यांकरिता २३ मोर्च रोजी आयोजित केलेली भटक्या विमुक्तांचे सामाजिक न्याय हक्क परिषद रद्द करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भटक्या विमुक्त विचार मंचचे राज्याध्यक्ष दलित मित्र व्यंकाप्पा भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी निबंध स्पर्धा

कोल्हापूर : राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. एकाकी ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा, ज्येष्ठ नागरिक संघटना यांची गुणात्मक स्थिती, ‘ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व उपाय’, ‘कोरोनामध्ये काय कमावले, काय गमवले’, ‘ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलबजावणी’, ‘ज्येष्ठांसाठी योग आणि अध्यात्म’ असे निबंधाचे विषय आहेत. शब्द मर्यादा ८०० असून, २१ मार्चपर्यंत राजारामपुरी, आठवी गल्ली, सम्राट सोसायटी, स्विमिंग टँक येथील संघाचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. मानसिंगराव जगताप यांच्याकडे पाठवावे, असे आवाहन केले आहे.

फेरीवाल्यांवर अन्याय नको

कोल्हापूर : शहर सुंदर करण्याच्या नावाखाली गौरगरीब फेरीवाल्यांवर सुरू असलेला अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला आहे. अंबाबाई मंदिर परिसरातील फेरीवाल्यांच्या प्रश्नासंदर्भात शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या हॉलमध्ये बैठक झाली. यावेळी तेे बोलत हाेते. पवार म्हणाले, गेल्या एक महिन्यापासून येथील चिंचा, आवळे विक्रेत्यांचा व्यवसाय बंद आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कायदा व व्यवहाराचे पालन झाले पाहिजे. गरिबांचा बळी जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. यासंदर्भात महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावू. या बैठकीला शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, सुरेश जरग, आप्पा पुणेकर, प्रवीण पालोजी, प्रकाश घाटगे, राजू जाधव, किरण गवळी आदी उपस्थित होते..

Web Title: Brief News Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.