संक्षिप्त वृत्त कोल्हापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:21 AM2021-03-19T04:21:35+5:302021-03-19T04:21:35+5:30

कोल्हापूर : जपलेल्या छंदाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने नरेंद्र विद्यापीठ संस्था आणि प्रोबस ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यावतीने निबंध स्पर्धा ...

Brief News Kolhapur | संक्षिप्त वृत्त कोल्हापूर

संक्षिप्त वृत्त कोल्हापूर

Next

कोल्हापूर : जपलेल्या छंदाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने नरेंद्र विद्यापीठ संस्था आणि प्रोबस ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यावतीने निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये डॉ. सुश्मिता मोहन गाडगीळ यांचा निबंधाला प्रथमक क्रमांक मिळाला. विलास सदाशिव जाधव यांना द्वितीय क्रमांक, सरोज गोळे, रमेश कुलकर्णी यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. आरेने हर्डीकर यांनी केले.

युवा सेनेकडून नितेश राणे यांचा निषेध

कोल्हापूर : युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या विरोधात बिनबुडाचे आरोप केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांचा कोल्हापूर युवा सेनेच्यावतीने मिरजकर तिकटी येथे त्यांचा निषेध केला. यावेळी मंजित माने, जयराम पवार, कुणाल शिंदे, मंगेश चितारे, दर्शन जाधव आदी उपस्थित होते.

सोशल मीडियाचा गैरवापर टाळा

कोल्हापूर : विद्यार्थ्यांना एखाद्या व्यक्तिगत व्यंग, वेशभूषा, जात धर्म आदी संदर्भात लज्जा उत्पन्न होईल, अशी कृती केली तर रॅगिंग ॲक्ट लागू होतो. त्यामुळे तरुणाईने स्वत:च्या आयुष्याची दिशा ठरवावी. सोशल मीडियाचा गैरवापर टाळावा, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण समिती सदस्य ॲड. दिलशाद मुजावर यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये ‘अँटी रॅगिंग व सायबर क्राईम’ विषयी जागृती उपक्रम महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभाग आणि महिला व बालकल्याण समितीच्यावतीने घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे, महिला व बालकल्याण समिती सदस्य ॲड. संजय मुंगळे, चाईल्ड लाईनच्या समन्वयक अनुजा खुरंदळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. ए. टी. पाटील, प्रा. आर. वाय. पाटील, उपप्राचार्या प्रा. नंदिनी साळुंखे, प्रा. प्रशांत शेटे, प्रा. ज्योती कांबळे, अस्मिता पवार आदी, उपस्थित होते.

डिगे फौंडेशनकडून कोरोना योद्धांचा सत्कार

माजी खासदार एस.के. डिगे मेमोरियल फौंडेशनच्यावतीने कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. शाहू स्मारक भवनात रविवारी माजी महापौर निलोफर आजरेकर, डॉ. धनंजय लाड, कार्यकारी अभियंता आर.एस. पांडे, सदानंद डिगे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. औषध वैदकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. महेंद्र बनसोडे यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार केल्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माधुरी डिगे, महादेव कांबळे, स्वप्निल डिगे, विकी कांबळे आदी, उपस्थिीत होते.

फोटो : १८०३२०२१ कोल डिगे पुरस्कार

ओळी : कोल्हापुरातील डिगे फौंडेशनच्यावतीने कोरोना योद्धांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

कर्तृत्ववान महिलांचे कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी

कोल्हापूर : सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, फातिमा बेदी यासारख्या कर्तुत्ववान महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्याचा ठसा निर्माण करून स्त्रीशक्तीचा परिचय करून दिला. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरले, असे प्रतिपादन प्रा. राजश्री पोवार (बिसुरे) यांनी केले. गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयामध्ये सुशीलादेवी देसाई युवती सचेतना फौंडेशनच्यावतीने आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. फौंडेशनच्या अध्यक्षा प्रा. डॉ. मंजिरी मोरे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी डॉ. पी. के. पाटील, प्रा. पद्मश्री आवटे यांनी मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य प्रा. एच. एस. पिसाळ, पर्यवेक्षक प्रा. एस. एन. मोरे, प्रा. संध्या नागन्नावर आदी उपस्थित होते.

Web Title: Brief News Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.