संक्षिप्त बातम्या पट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:34+5:302021-06-09T04:31:34+5:30
कोल्हापूर : येथील करवीर नगर वाचन मंदिराच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी सभेमध्ये नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. नंदकुमार ...
कोल्हापूर : येथील करवीर नगर वाचन मंदिराच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी सभेमध्ये नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. नंदकुमार जोशी होते. उपाध्यक्ष नंदकुमार मराठे, हिशेब तपासणीस दीपक गाडवे यांच्या उपस्थितीत सभा झाली.
पदाधिकारी असे : अभिजित भोसले (कार्याध्यक्ष), डॉ श्रीकृष्ण साळोखे (उपकार्याध्यक्ष), डॉ आशुतोष देशपांडे (कार्यवाह), अश्विनी वळिवडेकर (सहकार्यावह), उदय सांगवडेकर (कोषाध्यक्ष).
गरजूंना धान्य वाटप
कोल्हापूर : कोरोना कालावधीत हातावरचे पोट असलेल्या कुटुंबीयांना सामाजिक कार्यकर्त्या सविता शशीकांत पाटील यांच्याकडून संभाजीनगर परिसरात धान्य वाटप करण्यात आले. या उपक्रमात अतुल पाटील, शशिकांत पाटील, नेताजी शिंदे, हैबतराव इंगळे, अण्णा शेळके, धनाजी घोरपडे, सागर लाड आदी सहभागी झाले.
शिवराज्याभिषेक सोहळा
कोल्हापूर : येथील गंगावेश परिसरातील राजर्षि शाहू जीवन विकास ट्रस्टतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. अध्यक्ष किरण मांगुरे यांनी शिवप्रतिमेस अभिषेक घालून अभिवादन केले. राज्याभिषेक दिनानिमित्त गोरगरीब वंचित, अपंग २०० लोकांना रात्रीचे जेवण वाटप करण्यात आले. या वेळी बंटी रावळ, आनंद गुरव, रमेश संकपाळ, बाळासाहेब पाटोळे, अमित चिंदगे आदी उपस्थित होते.
(फोटो : ०८०६२०२१-कोल-शाहू मदत) : ओळ दिलेली नाही.
पाच हजार शेणी दान
कोल्हापूर : येथील महाराष्ट्र हायस्कूलच्या १९५-९६ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी चैतन्यस्पर्श फाउंडेशनच्यावतीने पाच हजार शेणी दान करण्यात आल्या. फाउंडेशनचे संचालक अभिजित भोसले, नंदकिशोर इंगवले, अभिजित सरनाईक, संदीप साळोखे, सोनल सावंत, अरविंद तवटे, अभिजित पाटील उपस्थित होते. पंचगंगा स्मशानभूमीत शेणीची गरज असल्याचे विचारात घेऊन ही मदत करण्यात आली.
अनिल जाधव यांच्याकडून मदत
कोल्हापूर : येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून अत्यावश्यक सेवेतील पोलिस कर्मचारी व गरजूंना तिथे जाऊन पोटभर जेवण वाटप केले. रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, आयसोलेशन रुग्णालय, शेंडा पार्क आदी ठिकाणी जेवण वाटप करण्यात आले. या वेळी उमेश इंगवले, रोहन कांबळे, गणेशभाऊ जाधव, संग्राम इंगवले, सूर्यकांत गायकवाड व मित्र परिवार सहभागी झाले.