जयंतीदिनी भाऊसाहेब निंबाळकर यांच्या आठवणींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:37 AM2020-12-13T04:37:47+5:302020-12-13T04:37:47+5:30
कोल्हापूर : विक्रमवीर कॅप्टन भाऊसाहेब निंबाळकर यांच्या १०१ व्या जयंतीदिनी आठवणींना उजाळा दिला गेला. शिवाजी स्टेडियमध्ये साध्या पद्धतीने ...
कोल्हापूर : विक्रमवीर कॅप्टन भाऊसाहेब निंबाळकर यांच्या १०१ व्या जयंतीदिनी आठवणींना उजाळा दिला गेला. शिवाजी स्टेडियमध्ये साध्या पद्धतीने कार्यक्रम झाला. कोरोनामुळे जाहीर कार्यक्रमावर निर्बंध आले असले तरी नियोजित सर्व कार्यक्रम पुढील काही दिवसांत टप्प्याटप्प्याने घेण्याचा मनोदयही बोलून दाखविला.
निंबाळकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव नेताजी निंबाळकर व केडीसीएचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पाटणकर यांनी छत्रपती शाहू महाराज व भाऊसाहेब हे लाॅन टेनिस खेळत असताना झालेले गमतीशीर किस्से सांगितले. त्यांच्या जयंती शताब्दी वर्षाचा प्रारंभ गेल्यावर्षी काेल्हापूर, पुणे, इंदोर येथून एकाच वेळी झाला होता; पण कोराेनामुळे हे कार्यक्रम घेता आले नाहीत. पण त्याचे भविष्यात नियोजन करावे असे आवाहनही केले.
केडीसीएचे उपाध्यक्ष रमेश हजारे, जनार्दन यादव, अजित मुळीक, कृष्णात धोत्रे, राजेश केळवकर, नितीन पाटील, किरण रावण यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन केदार गयावळ यांनी केले.
फोटो: १२१२२०२०-कोल-निंबाळकर
फोटो ओळ : विक्रमवीर कॅप्टन भाऊसाहेब निंबाळकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शनिवारी शिवाजी स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रतिमा पुजन करून आठवणींना उजाळा दिला गेला.