गडहिंग्लज कारखान्याला 'ब्रिस्क'ची देणी अमान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:19 AM2021-06-05T04:19:22+5:302021-06-05T04:19:22+5:30

* न्यायालयात दाद मागणार : संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय गडहिंग्लज : ब्रिस्क फॅसिलिटिज कंपनीला २४ कोटी ६५ लाख ...

Brisk's debt to Gadhinglaj factory invalid | गडहिंग्लज कारखान्याला 'ब्रिस्क'ची देणी अमान्य

गडहिंग्लज कारखान्याला 'ब्रिस्क'ची देणी अमान्य

Next

* न्यायालयात दाद मागणार : संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

गडहिंग्लज :

ब्रिस्क फॅसिलिटिज कंपनीला २४ कोटी ६५ लाख रुपये देण्याच्या अतिरिक्त सहकार सचिव अरविंदकुमार यांच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे होते. २०१४ ते २०२१ अखेर 'ब्रिस्क'ने सहयोग तत्त्वावर गडहिंग्लज कारखाना चालवला. दरम्यान, यंदाच्या हंगाम अखेरीस यापुढे कारखाना चालविणार नसल्याचे कंपनीने शासनाला कळविले. त्यानुसार सहकार विभागाच्या समितीने हा कारखाना कंपनीकडून संचालक मंडळाच्या ताब्यात दिला आहे.

दरम्यान, अरविंदकुमार यांच्यासमोर कंपनी व कारखाना यांच्या एकमेकांकडील येणी-देणी संदर्भातही सुनावणी झाली होती. त्याबाबत त्यांनी 'ब्रिस्क'ची देणी तीन महिन्यांच्या आत देण्याचा आदेश कारखान्याला दिला आहे. या आदेशासह कारखाना चालविण्यासंदर्भातील विचार विनिमयासाठी ही बैठक झाली. 'ब्रिस्क'ने कारखान्याच्या उत्पादक व अनुत्पादक सभासदांना दिलेल्या सवलतीच्या दरातील साखरेपोटी झालेली खर्च ९ कोटी १७ लाख, करारात नसतानाही भागवलेली युनियन बँक व स्टेट बँकेची ७ कोटी ९१ लाखाची देणी, प्रदूषण नियंत्रणासाठीचा खर्च ८ कोटी ८२ लाख मिळून २४ कोटी ६५ लाख रुपये कारखान्याने कंपनीला द्यावेत, असा आदेश देण्यात आला आहे. चर्चेअंती ही देणी अमान्य करण्यात आली.

कंपनीकडून कारखान्याला देय असणा-या रकमांचा विचार न करताच देण्यात आलेल्या एकतर्फी आदेशाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला. चर्चेत कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. शिंदे, उपाध्यक्ष डॉ. संग्रामसिंह नलवडे, संचालक डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, अमर चव्हाण यांनी भाग घेतला. बैठकीस सतीश पाटील व क्रांतिदेवी कुराडे वगळता सर्व संचालक उपस्थित होते.

---------------------------------

* कारखाना 'स्वबळावर'च चालविणार 'ब्रिस्क'ने कराराची मुदत संपण्यापूर्वीच कारखाना सोडल्यामुळे यापुढे कारखाना स्वबळावरच चालविण्याबाबतही बैठकीत एकमत झाले. त्यासाठी राज्य शासनाची थक हमी आणि वित्तीय संस्थांकडून अर्थसाहाय्य उपलब्ध करण्यासंदर्भात एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

---------------------------------

फोटो : गडहिंग्लज कारखाना : ०४०६२०२१-गड-०५

Web Title: Brisk's debt to Gadhinglaj factory invalid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.