ब्रिटिशांनाही होते कुतूहल जोतिबाच्या यात्रेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:47 PM2019-04-17T23:47:55+5:302019-04-17T23:48:01+5:30

मुरलीधर कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चैत्र महिन्यात होणाऱ्या जोतिबाच्या यात्रेचे भारतीयांइतकेच ब्रिटिशांनाही कुतूहल होते. लाखोंच्या संख्येने ...

The British also had the curiosity of Jyotiba Yatra | ब्रिटिशांनाही होते कुतूहल जोतिबाच्या यात्रेचे

ब्रिटिशांनाही होते कुतूहल जोतिबाच्या यात्रेचे

googlenewsNext

मुरलीधर कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चैत्र महिन्यात होणाऱ्या जोतिबाच्या यात्रेचे भारतीयांइतकेच ब्रिटिशांनाही कुतूहल होते. लाखोंच्या संख्येने येणाºया भाविकांची व्यवस्था नेमकी कशी केली जाते, याबद्दल त्यांना उत्सुकता होती. या संबंधीची एक बातमी इंग्लंडमधून प्रसिद्ध होणाºया होमवर्ड मेल या वृत्तपत्रात ८ जून १८६८ रोजी छापून आली होती, अशी माहिती यशोधन जोशी यांनी दिली. जोशी हे एल अँड टी कंपनी, पुणे येथे प्रोजेक्ट मॅनेजर पदावर कार्यरत असून, मूळचे कोल्हापुरातील सानेगुरुजी वसाहत येथील रहिवासी आहेत.
इतिहासाचे अभ्यासक असलेले जोशी हे ब्रिटिश अर्काइव्हमध्ये कोल्हापूरसंबंधी माहिती शोधत असताना त्यांना ही बातमी सापडली. या बातमीमध्ये त्या काळात झालेल्या जोतिबाच्या यात्रेची दिलेली माहिती मोठी रंजक आहे. वाहनांची सोय नसल्याने यात्रेकरू तसेच नारळ, गुलाल या मालांची वाहतूक प्रामुख्याने बैलगाडीने व्हायची. यात्रेच्या काळात काढल्या जाणाºया मिरवणुकीसाठी हत्ती, घोडे, उंट यांचा वापर केला जायचा. तसेच जोतिबा डोंगरावर येणाºया यात्रेकरूंसाठी अन्नछत्रही चालायचे, अशी माहिती या बातमीत देण्यात आली आहे. १८५४ सालच्या मेजर ग्रॅॅहमच्या एका रिपोर्टनुसार जोतिबा संस्थानचे त्यावेळचे वार्षिक उत्पन्न अंदाजे १२ हजार रुपये असल्याचा उल्लेखही या बातमीत आहे. शेकडो बैलगाड्यातून नारळ तसेच गुलाल यात्रेसाठी आणला जात असल्याचा उल्लेखही या बातमीत आढळतो.
यात्रा काळात जमादाराचा खून
यात्रेसाठी बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी त्याकाळी ब्रिटिश सरकारची होती. त्यांचे पोलिस बंदोबस्तासाठी असायचे. दर्शनासाठी येणाºया भाविकांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना लवकर सोडण्याचे प्रकारही चालायचे. या गोष्टीची तक्रार झाल्याने एक जमादार तपासणीसाठी आला असता त्यांना एक हवालदार लाच घेताना रंगेहात सापडला. त्या हवालदाराचा ब्रिटिश सरकारच्या जमादाराने सर्वासमक्ष चांगलाच पाणउतारा केला; पण हे करीत असताना जमादाराने उच्चारलेले काही शब्द हवालदाराच्या जिव्हारी लागले. त्यामुळे संतापलेल्या हवालदाराने त्या जमादाराचा तंबूत घुसून गोळी झाडून खून केला होता. नंतर त्या हवालदाराला ब्रिटिश पोलिसांनी अटक केल्याचाही उल्लेख या बातमीत आहे.

Web Title: The British also had the curiosity of Jyotiba Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.