‘आजरा’च्या रणांगणात इच्छुकांची भाऊगर्दी

By Admin | Published: April 28, 2016 11:25 PM2016-04-28T23:25:43+5:302016-04-29T00:52:51+5:30

छाननीनंतर २२२ अर्ज : थांबवायचे कोणाला? नेत्यांपुढे बंडाचा पेच

The brother-in-law of 'Azra' | ‘आजरा’च्या रणांगणात इच्छुकांची भाऊगर्दी

‘आजरा’च्या रणांगणात इच्छुकांची भाऊगर्दी

googlenewsNext

आजरा : आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी छाननीनंतर २२२ उमेदवारांचे २६७ उमेदवार अर्ज राहिल्याने २१ जागांसाठी उमेदवार निवडीचा पेच गटनेत्यांसमोर असून उमेदवारी नाकारली तर ‘नाराज’ इच्छुक विरोधी आघाडीला रसद पुरविण्याचा धोकाही दिसत आहे.
कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसची आघाडी व विरोधात अशोकअण्णा चराटी, विष्णूपंत केसरकर व मित्रपक्षांची आघाडी अशी थेट लढत होणार आहे. दोन्हीही आघाड्या नेटक्या होणार असल्याने दोन्ही आघाड्यांमधून इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. बेरजेच्या राजकारणात आजपर्यंत उमेदवारी निश्चित असणाऱ्यांपैकी अनेकांचे पत्ते ऐनवेळी कट होणार आहेत.
दोन्ही आघाड्यांची बऱ्यापैकी पॅनेलरचना झाली आहे. राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडीतून जयवंतराव शिंपी, अल्बर्ट डिसोझा, मुकुंदराव देसाई, उदय पवार, सुधीर देसाई, सदाशिव डेळेकर, श्रीमती अंजनाताई रेडेकर, बी. टी. जाधव, वसंतराव धुरे, संभाजी पाटील (हत्तीवडे), उमेश आपटे, अनिल फडके, विकास बागडी, आप्पासाहेब खेडेकर, प्रा. सुनिल शिंत्रे, एम. के. देसाई यांची उमेदवारी निश्चित आहे.
विरोधी आघाडीतून अशोकअण्णा चराटी, दिगंबर देसाई, विष्णूपंत केसरकर, नागोजी पाटील, सुनिता रेडेकर, नर्मदा सावेकर, दशरथ अमृते, बापूसाहेब सरदेसाई, विनायक देसाई, आनंदराव कुलकर्णी, मलिक बुरूड, राजू सावंत, संजय पाटील आदींची उमेदवारी निश्चित आहे.
दोन आघाड्यांमध्ये दोन-चार जागांची निश्चिती होणे बाकी आहे. इच्छुकांची संख्या निश्चित झालेल्या उमेदवारी वगळता १८० च्या घरात आहे. दोन्ही पॅनेलमध्ये मिळून ७ ते ८ जागांकरिता १८० जण असल्याने नेतेमंडळींना पेचात टाकण्याचे काम इच्छुकांनी केले आहे. (प्रतिनिधी)


राष्ट्रवादीचा ४ मे रोजी मेळावा
राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडीचा बुधवारी (४ मे) बाजार मैदान, आजरा येथे आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदिनी बाभूळकर, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर येथील जनता बँकेत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकही पार पडली. मेळाव्याचे नेटके नियोजन करण्यात येत आहे.

Web Title: The brother-in-law of 'Azra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.