‘फार्मसी’च्या माध्यमातून करिअर घडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:30 AM2021-09-16T04:30:50+5:302021-09-16T04:30:50+5:30
येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजित डी.फार्मसी प्रथम वर्ष परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था ...
येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजित डी.फार्मसी प्रथम वर्ष परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे होते. डॉ. डिसोझा म्हणाले, केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. किंबहुना, भावनिक बुद्धिमत्ता हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
यावेळी सचिव कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, संचालक दिग्विजय कुराडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास उपाध्यक्ष जाकोबा बारदेस्कर, समन्वयक प्रा. विक्रम शिंदे, अक्षय कित्तूरकर आदींसह प्राध्यापक व सेवक उपस्थित होते.
यावेळी स्वाती मुरगी, सुशांत थोरवत व शिल्पा केसरकर या यशवंत विद्यार्थ्यांसह अन्य गुणी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.
प्राचार्य संतोष कुरबेट्टी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. सुमन अडीसरे यांनी आभार मानले. फोटो ओळी : गडहिंग्लज येथे स्मिता मुरगी हिचा सत्कार करताना प्राचार्य जॉन डिसोझा. शेजारी प्राचार्य संतोष कुरबेट्टी, संचालक दिग्विजय कुराडे, प्राचार्य एस. एम. कदम, सचिव डॉ. अनिल कुराडे, आदी उपस्थित होते.
क्रमांक : १५०९२०२१-गड-०७