आरोग्यदायी गुढी उभारू, कोरोनाला हरवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:21 AM2021-04-12T04:21:37+5:302021-04-12T04:21:37+5:30

संदीप बावचे : जयसिंगपूर : कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने सरकारने ब्रेक द चेन लागू करून कडक नियम ...

Build a healthy Gudi, defeat Corona | आरोग्यदायी गुढी उभारू, कोरोनाला हरवू

आरोग्यदायी गुढी उभारू, कोरोनाला हरवू

Next

संदीप बावचे :

जयसिंगपूर : कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने सरकारने ब्रेक द चेन लागू करून कडक नियम सुरू केले आहेत. या नियमांचे सर्वांनी पालन करण्याची गरज आहे. कोरोनाचा वाढता प्रसार प्रशासनासमोर चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील जनतेने कोरोनाला हरविण्यासाठी नियम पाळून आरोग्याची गुढी उभारावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गतवर्षी शिरोळ तालुक्यात कोरोनाचा पहिला टप्पा मे महिन्यात सुरू झाला होता. बारा रुग्ण आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. प्रशासन, आरोग्य विभागाची धावपळ उडाली होती. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांत कोरोनाने कहर केला होता. त्यामुळे कोरोनाचा आलेख पाहता नोव्हेंबरपर्यंत ४२०० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढू लागल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. ब्रेक द चेनसाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद आहेत. त्यामुळे ग्रामसमित्यांनी पुन्हा एकदा सक्रिय होऊन कोरोनाला वेशीवरच थोपविण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

मास्कचा वापर, सामाजिक अंतर व सॅनिटायझरचा वापर नागरिकांनी केला पाहिजे. कोरोनाची दुसरी लाट उंबरठ्यावर आली आहे. त्यामुळे शिरोळ तालुका हॉटस्पॉट होण्यापूर्वीच प्रशासन व लोकप्रतिनिधींना एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. शिवाय, रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार थांबविण्याची देखील गरज आहे.

-------------

चौकट - लसींची गरज

कोरोना लसीकरणासाठी प्रशासनाने व्यापक स्तरावर जनजागृती केली होती. यामुळे नागरिकदेखील लसीकरणासाठी पुढे येऊ लागले होते. मात्र, मर्यादित लसीचे डोस मिळत असल्याने आरोग्य विभागाला अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे लसीचा पुरवठा महत्त्वाचा ठरणार आहे.

चौकट - ग्रामसमित्या नियुक्तीचे आदेश

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामसमित्या स्थापित करण्यात आल्या आहेत. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आशा स्वयंसेविका, धान्य दुकानदार, संस्थांचे अध्यक्ष, शासकीय व खासगी डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, तरुण मंडळे, बचत गट, कोतवाल, पोलीस पाटील यांचा यामध्ये समावेश आहे.

Web Title: Build a healthy Gudi, defeat Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.