लक्ष्मीदर्शन घडवा, मनासारखी बढती अन् टेबल मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:30 AM2019-02-04T00:30:38+5:302019-02-04T00:30:49+5:30
नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पारदर्शी, हायटेक कारभाराचे बिरूद मिरविणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या ‘लक्ष्मीदर्शना’चा नवा फंडा ...
नसिम सनदी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पारदर्शी, हायटेक कारभाराचे बिरूद मिरविणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या ‘लक्ष्मीदर्शना’चा नवा फंडा सुरू झाला आहे. बढती हवी आहे, मनासारखे टेबल हवे आहे तर ठरावीक रक्कम मोजल्याशिवाय मनासारखे स्थान मिळत नसल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे यात संबंधित टेबल सांभाळणाºयापासून ते सदस्यांच्या नातेवाइकांपर्यंत सर्वांचाच हातभार लागत आहे. शिपायांना आरोग्यसेवक म्हणून बढती देताना या सर्व यंत्रणेने हात धुऊन घेतल्याची जिल्हा परिषदेत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
जिल्हा परिषदेत सध्या समायोजन प्रक्रिया सुरू असून त्याअंतर्गत अनुकंपा तत्त्वावर भरती झालेल्या शिपायांना बढती दिली जात आहे. ६४ जण बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांपैकी १७ शिपायांना प्राथमिक टप्प्यात आरोग्यसेवक म्हणून बढती देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. या बढतीत अन्य निकषांपेक्षा लक्ष्मीदर्शनाचा निकष सर्वांत महत्त्वाचा ठरला आहे. प्रशासन आणि आरोग्याशी संबंधित विभागासह एका जिल्हा परिषद सदस्याच्या पतीनेही यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. या सर्वांनी एकत्रितपणे येऊन पाच दशकाच्या पटीत रक्कम निश्चित केली; पण काही कर्मचाºयांनी असमर्थता दर्शविल्यानंतर त्यात शिथिलता आणली गेली. किमान दोन दशकांची अट ठेवून त्या पटीत रकमा वसूल झाल्यानंतर बढतीची पत्रे दिली गेली आहेत. ही सर्व रक्कम साधारणपणे पाच लाखांच्या घरात गेली असल्याची चर्चा आहे. त्याचे वाटेही ठरले आहेत. यात टेबल सांभाळणाºयापासून ते वरची अंतिम सही करण्यापर्यंत सर्वांना रक्कम पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना याची कुणकुण लागू नये याची विशेष खबरदारीही घेतली गेली आहे. जिल्हा परिषदेच्या वर्तुळात मात्र याची जोरदार चर्चा सुरू आहे.
संघटनेच्या माजी पुढाºयाची मध्यस्थी
आपलेच सहकारी असणाºया कर्मचाºयांवर अन्याय झाला तर तो दूर करावा यासाठी श्रेणीनिहाय कर्मचारी संघटना स्थापन झाल्या आहेत.
या संघटनांच्या पुढाºयांनी कर्मचाºयांचे हित पाहावे असे अपेक्षित
असते; तथापि बढती प्रकरणात माजी पदाधिकाºयानेच प्रमुख मध्यस्थाची भूमिका वठविली आहे. अधिकाºयांच्या पुढे-पुढे करून त्यांची मर्जी सांभाळत मनासारखे पद मिळविणाºया या पुढाºयाविरोधात कर्मचाºयांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.