बचत गट साहित्य विक्री केंद्राची इमारत अर्धवट

By admin | Published: December 25, 2014 11:49 PM2014-12-25T23:49:17+5:302014-12-26T00:06:32+5:30

इमारतीचे काम अर्धवट; २५ लाखाचा खर्च.

Building Group Selling Centers | बचत गट साहित्य विक्री केंद्राची इमारत अर्धवट

बचत गट साहित्य विक्री केंद्राची इमारत अर्धवट

Next

आसाममधील हिंसाचाराने बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा उचल खाल्ली आहे. काश्मीरबरोबरच आसामलाही अशांततेचा शाप आहे. उल्फा या फुटीर संघटनेवर विजय मिळवल्यानंतर आता आसामला शांतता लाभेल असे वाटत होते, बोडोलँडच्या मागणीची तीव्रताही कमी झाली होती, तरीही आता अचानक ‘नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलँड’ या संघटनेच्या सोंगबिजित गटाने आसामात चहाच्या मळ्यात कामासाठी बाहेरून आलेल्या लोकांवर हल्ले करून बायका-मुलांसह जवळपास ७0 लोकांना ठार मारले व त्यांची घरे जाळली. आसामच्या विविध भागात रोजगारासाठी पश्चिम बंगाल व बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात बंगाली भाषिक येत असतात. त्यामुळे आसामातील स्थानिकांत पूर्वापार असंतोष आहे. त्यातूच उल्फाची स्वतंत्र आसामची आणि बोडोंची बोडोलँडची मागणी पुढे आली आहे. अशीच फुटीरतेची मागणी नागालँड व मिझोराम, त्रिपुरा या राज्यांतूनही होत असते; पण आता या भागात सरकारी यंत्रणा बऱ्यापैकी पोहोचल्या आहेत आणि हळूहळू या भागाचे देशाच्या अन्य भागाशी दळणवळणही वाढू लागले आहे. त्यामुळे या भागातील तरुण मंडळींना फुटीरतेच्या मागणीचे फारसे आकर्षण राहिलेले नाही. अरुणाचल, नागालँड, मिझोराम व आसाममधील अनेक तरुण-तरुणी अलीकडच्या काळात शिक्षणासाठी दिल्ली. मुंबई, पुण्यात येऊ लागले आहेत व त्यांना आपण भारतीय आहोत, याची जाणीव होऊ लागली आहे; पण तरीही अजून बराच पल्ला गाठायचा आहे. ईशान्येकडील तरुण मंडळी स्वत:ला भारतीय मानू लागली असली, तरी उर्वरित भारतीय त्यांना आपल्या सामावून घेण्यास अद्याप तयार नाहीत. त्यामुळेच अलीकडच्या काळात दिल्ली, बंगळुरू येथे ईशान्य भारतीय तरुण-तरुणींवर हल्ले झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ईशान्य भारतीयांत अलगतेची भावना निर्माण झाली, तर त्यांना दोष देता येणार नाही. देशाच्या एकात्मतेबाबत ईशान्य भारतीय आणि काश्मिरींपेक्षाही बाकीच्या भारतीयांचे अधिक प्रबोधन होण्याची गरज आहे. बोडो संघटनेने आसामात केलेला ताजा भीषण संहार हा फुटीरतेच्या मागणीपेक्षाही अन्य भाषिक मजुरांचा सूड घेण्यासाठी आहे. मध्यंतरी ‘नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलँड’च्या अतिरेक्यांविरुद्ध सुरक्षादलांनी कारवाई केली, त्यात ४0 अतिरेकी मारले गेले होते. यासाठी चहा मळ्यावर काम करणाऱ्या अन्य भाषिक मजुरांनी सुरक्षादलाला मदत केल्याचा संशय आल्यावरून बोडोंनी या मजुरांवर हा ताजा हल्ला केला आहे. त्यामुळे हा हिंसाचार म्हणजे बोडोंच्या फुटीर लढ्याचा भाग नाही, तर तो दहशतवादाचा भाग आहे. त्यामुळे तो बळानेच मोडून काढावा लागणार आहे. बोडोंच्या भूमीवर बोडोंचा प्रथम अधिकार आहे, हे कुणीच नाकारत नाही, अन्य प्रांतिक, भाषिक लोक त्यांचे अधिकार बळकावत असतील, तर त्याविरुद्ध आवाज उठविण्याचाही त्यांना अधिकार आहे, पण त्यासाठी अमानुष असा हिंसाचार करण्याचा अधिकार नाही. त्यातही बोडो अतिरेक्यांनी लहान मुले व बायकांना निर्घृणपणे ठार केले आहे. या कृत्याला दहशतवाद मानूनच सरकारला कारवाई करावी लागेल. या बोडो संघटनेचे काही नेते कारागृहात आहेत. त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठीही अधूनमधून हिंसाचार होतो; पण त्याची तीव्रता कमी होत चालली असताना असा हा मोठा हिंसाचार होणे चिंताजनक आहे. आसाम सरकारच्या पोलीस खात्याला या हिंसाचाराची पूर्वकल्पना मिळू नये, हे योग्य नाही. आसामातील फुटीर चळवळींतली हवा आता जात असली, तरी फुटीरांचे छोटे गट कायम आहेत व ते संधी मिळताच डोके वर काढतात. त्यांना सतत चर्चेत गुंतविण्याचे सरकारचे धोरण असले, तरी त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कारण या फुटीर संघटना इतक्यात समूळ नष्ट होणाऱ्या नाहीत. त्यांच्या हालचालींकडे गुप्तचरांचे थोडे जरी दुर्लक्ष झाले, तरी अशा अचानक होणाऱ्या हिंसाचाराला सामोरे जावे लागते. बोडो ही आसामातील प्राचीन जमात आहे. त्यांची अस्मिता प्रखर आहे. तिबेटी आणि ब्रह्मदेशी बोलीतून निर्माण झालेली बोडो भाषा, संस्कृती आपले वेगळेपण बऱ्यापैकी राखून आहे. या भाषेत साहित्य निर्मिती होते व चित्रपटही निर्माण केले जातात. त्यामुळे या बोडो संस्कृतीला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. बोडोंच्या राजकीय महत्त्वाकांक्षांनाही राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळाले पाहिजे. ईशान्येकडील राज्ये हा भारताचा भाग आहे याची जाणीव उर्वरित भारताला आता कुठे होऊ लागली आहे. त्यामुळे बोडोंवर फुटीरतेचा शिक्का मारण्याआधी या आपल्या देशबांधवांच्या प्रती आपले काय कर्तव्य आहे, याचा अन्य भारतीयांनीही विचार करायला हवा.

Web Title: Building Group Selling Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.