पर्यटन विकासात बुलडाणा जिल्ह्याचा समावेश
By admin | Published: March 18, 2015 11:38 PM2015-03-18T23:38:15+5:302015-03-18T23:38:15+5:30
अर्थसंकल्पात एकाच ठिकाणी उल्लेख; बुलडाणा जिल्ह्यासाठी स्वतंत्र योजना नाही.
कोल्हापूर : उन्हाळी सुटीच्या हंगामासाठी कोल्हापूर ते पूर्णा (परभणी) विशेष साप्ताहिक एक्स्प्रेसला बुधवारपासून सुरुवात झाली. या एक्स्प्रेसमुळे मिरज-पंढरपूरमार्गे मराठवाड्यात जाण्यासाठी प्रवाशांची सोय झाली आहे.कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती टर्मिनसवरून दुपारी पावणेचार वाजता भागीरथी महिला मंचच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी भानुदास यादव महाराज, स्टेशन मास्तर सुग्रीव मीना, कृष्णराव सोळंकी, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, समीर शेठ, आदी उपस्थित होते. या नव्या एक्स्प्रेसमधून मोटरमन सी. जी. आवले, सहायक चालक विनोद वर्मा, गार्ड व्ही. डी. जाधव कोल्हापुरातून रवाना झाले. कोल्हापूर-पूर्णा एक्स्प्रेस कोल्हापूरमधून दर बुधवारी पावणेचार वाजता सुटणार असून, ती पूर्णा येथे गुरुवारी सकाळी सव्वा आठ वाजता पोहाचणार आहे तसेच परभणी येथून सकाळी अकरा वाजता सुटून कोल्हापूरमध्ये मध्यरात्री एक वाजता येणार आहे. ही विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस २५ जूनपर्यंत धावणार असून ती रूकडी, हातकणंगले, मिरज, कवठेमहांकाळ, ढालगाव, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डूवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, पानगाव, परळी, परभणी या स्थानकावर थांबणार आहे. एक्स्प्रेसमध्ये सहा जनरल, तीन वातानुकूलित, दोन एसएलआर आणि नऊ आरक्षित असे २० डबे आहेत. (प्रतिनिधी)