सोलापूरचा बैल चॅम्पियन

By admin | Published: January 28, 2016 12:37 AM2016-01-28T00:37:55+5:302016-01-28T00:42:40+5:30

भिमा कृषी प्रदर्शनाची सांगता : कोट्यवधींची उलाढाल; गर्दीचा उच्चांक

Bull champion of Solapur | सोलापूरचा बैल चॅम्पियन

सोलापूरचा बैल चॅम्पियन

Next

कोल्हापूर : भिमा उद्योग समूहातर्फे भरविण्यात आलेल्या भिमा कृषी प्रदर्शनात सोलापूरच्या तुकाराम बंडगर यांच्या खिल्लारी बैलाने ‘चॅम्पियन आॅफ द शो’चा किताब पटकाविला. विजेत्यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मेरी वेदर ग्राउंडवर भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाने गर्दीचे सर्व उच्चांक मोडले. चार दिवसांत या प्रदर्शनाच्या माध्यमातून
कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.
भिमा कृषी प्रदर्शन मेरी वेदर ग्राउंडवर २३ जानेवारीपासून खुले झाले होते. पश्चिम महाराष्ट्रातील या सर्वांत मोठ्या प्रदर्शनाला लाखो शेतकऱ्यांनी भेट देऊन आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रदर्शनाची सांगता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाली. प्रदर्शनाचे संयोजक खासदार धनंजय महाडिक म्हणाले, निसर्गाचा लहरीपणा व पाण्याची दिवसेंदिवस वाढत असलेली टंचाई पाहता शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करणे गरजेचे आहे. ‘ठिबक’ला केंद्राने अनुदान द्यावे, यासाठी आगामी अधिवेशनात मागणी करणार आहे. मंत्री पाटील म्हणाले, राज्य सरकार टप्प्याटप्प्याने ठिबक योजना सक्तीची करण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्याला या योजनेत आर्थिक झळ कमीत कमी बसावी यासाठी सरकार सध्या काही अनुदान देत आहे. त्यामध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीची भर घालून शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात ठिबक करता यावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
प्रदर्शनात बचत गटाच्या उत्पादनांची उल्लेखनीय विक्री करणाऱ्या अरुणा दबाणे, मीनाक्षी ओतारी, पल्लवी गायकवाड, वर्षा घोटणे, सुलभा कांबळे, तसेच उल्लेखनीय विक्री करीत स्टॉलची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करणाऱ्या विक्रेत्यांचाही यावेळी मंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धनाजी चौगले, युवराज कारंडे, अक्षय गाडगीळ, अजित पाटील या पशुमालकांनाही गौरविण्यात आले. या वर्षीचा ‘चॅम्पियन आॅफ द शो’चा किताब सोलापूरच्या तुकाराम निवृत्ती बंडगर यांच्या खिल्लार बैलाने पटकावला. यावेळी आमदार अमल महाडिक, ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर, बसवराज मास्तोळी, डॉ. जे. पी. पाटील, सत्यजित
भोसले, धैर्यशी
ल बावसकर, सुनील कदम, सत्यजित कदम, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Bull champion of Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.