अतिक्रमणाला दणका

By admin | Published: May 26, 2014 01:12 AM2014-05-26T01:12:16+5:302014-05-26T01:13:23+5:30

मिळकतधारक संभ्रमात : तावडे हॉटेल परिसरात आज कारवाई

Bump of encroachment | अतिक्रमणाला दणका

अतिक्रमणाला दणका

Next

 कोल्हापूर : तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील महापालिका हद्दीतील अतिक्रमण हटविण्याची मोहीम उद्या (सोमवारी) हाती घेण्यात येणार आहे. पोलीस बंदोबस्तासह इमारत पाडण्यासाठी आवश्यक यंत्रणा महापालिकेने सज्ज ठेवली आहे. नेमक्या कोणत्या व किती मिळकतींवर कारवाई होणार याबाबत स्पष्टता नसल्याने मिळकतधारकांत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. तावडे हॉटेल ते गांधीनगर मार्गावर अनधिकृत बांधकामे उभारण्यात आलेली यामध्ये सुमारे २४ एकरांतील १३३ मिळकतधारकांच्या १०९ इमारती आहेत. ही जागा महापालिका व राज्य शासनाच्या दप्तरी असलेल्या नोंदीनुसार महापालिकेच्या मालकीचीच असून, ती जागा ट्रक टर्मिनस, कचरा डेपो व ना विकास क्षेत्र अशा कारणांनी आरक्षित होती. मात्र, जागा रितसर ताब्यात घेतल्यानंतर केवळ ७/१२ पत्रकी नोंद करून घेण्यात महापालिकेच्या अधिकार्‍यांनी हलगर्जीपणा केल्याने जागेच्या मालकी हक्कावरून वाद निर्माण झाला होता. उचगाव ग्रामपंचायतीने ही जागा ग्रामपंचायतीच्याच मालकीची असल्याचा दावा करत बांधकाम परवाने देऊन घरफाळा वसुलीही केला आहे. त्यातील आठ मिळकतधारकांना जिल्हाधिकारी कार्यालयाने गुंठेवारी नियमितीकरण केले आहे. जागा महापालिकेच्याच हद्दीत असल्याचा जिल्हा न्यायालयाने आदेश दिल्यानंतर महापालिका जागेवरील अतिक्रमणे काढण्याबाबत महापालिकेकडून दिरंगाई सुरू होती. येथील १३३ मिळकतींपैकी नोटिसा पाठविताना महापालिका व नगरसचिव कार्यालयाने संगनमताने मोठ्या ३८ मिळकती परस्पर वगळल्याचा आरोप महासभेत झाला. प्रशासन जाणीवपूर्वक कारवाई करण्यास टाळत असल्याचा ठपका ठेवल्याने आयुक्त बिदरी यांनी तत्काळ अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. बंदोबस्ताची मागणी करताचा पोलीस प्रशासनानेही तत्परता दाखविल्याने आता अतिक्रमण हटविण्याशिवाय प्रशासनासमोर दुसरा पर्याय राहिला नाही. या १९४५ च्या गॅझेटनुसार या सर्व महापालिकेत समाविष्ठ झालेल्या आहेत. मात्र, संबंधित जागेवर महापालिकेचे नाव लावण्यास विलंब झाल्याने आता प्रत्यक्ष कारवाई करताना अनेक अडचणी येणार आहेत. आठ मिळकतधारकांना कारवाईस मनाई आदेश मिळविला आहे तसेच आठ मिळकती १९४६पासून अस्तित्वात आहेत. यामुळे तोंडदेखलेपणाने कारवाई होण्याची शक्यता असल्याने प्रत्यक्ष कारवाईवेळी मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) आरक्षित जागेवर कारवाई कोल्हापूर गव्हर्न्मेंट गॅझेटनुसार १२ जुलै १९४५ रोजी गांधीनगर रस्त्यावरील १३३ मिळकती म्युनिसिपल हद्दीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यानंतर महापालिका सभागृहाने या जागांवर टाकलेल्या आरक्षणास १८/१२/१९९९ रोजी मान्यता दिली आहे. आरक्षण टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा उचगाव ग्रामपंचायतीने कोणतीही हरकत घेतलेली नव्हती तसेच या प्रक्रियेला आव्हानही दिले नव्हते. महापालिकेच्या दाव्यानुसार मौजे उचगाव (ता. करवीर) हद्दीतील रि. स. नं. ३४ (भाग) पैकी क्षेत्र १५ आर., ३५/१ (भाग) पैकी क्षेत्र ९ आर., ३६/६ (भाग) पैकी क्षेत्र १५ आर., ८४ ब /१ (भाग) नवीन हिस्सा ८४ ब /५ (भाग) पैकी क्षेत्र १७ आर., ८७ (भाग) १८ आर., ८८ (भाग) पैकी क्षेत्र ३१ आर., व १००/१ (भाग) पैकी ८ आर. या मिळकती भूमीसंपादन विशेष अधिकारी क्रमांक ११ यांच्याकडील २५/१/२००१ च्या पत्राप्रमाणे कलम १६ खालील ताबा घेऊन रितसर भूमी संपादन करून संबंधित मिळकत-धारकांना नुकसानभरपाई अदा करून रितसर महापालिकेच्या कब्जात दिलेली आहे. त्यामुळे आरक्षित जागेवर प्रथम कब्जा घेतला जाणार आहे.

Web Title: Bump of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.