दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा; मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:24 AM2021-04-21T04:24:11+5:302021-04-21T04:24:11+5:30

गेल्या दहा दिवसांपूर्वी दहावीच्या परीक्षेचे साहित्य आमच्या शाळेत बोर्डाकडून आले आहे. अचानकपणे परीक्षा पुढे गेल्या आहेत. कोरोनामुळे शाळा बंद ...

Burden of blank answer sheets of 10th-12th on schools; Headmaster's 'fever' increased! | दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा; मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला!

दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा; मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला!

Next

गेल्या दहा दिवसांपूर्वी दहावीच्या परीक्षेचे साहित्य आमच्या शाळेत बोर्डाकडून आले आहे. अचानकपणे परीक्षा पुढे गेल्या आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने हे साहित्य सांभाळण्याची कसरत आम्हाला करावी लागत आहे. बोर्डाने सर्व केंद्रांवरील साहित्य आपल्या ताब्यात पुन्हा घेतल्यास अधिक बरे होईल.

- बी. आर. अकिवाटे, मुख्याध्यापक,

डी. सी. नरके विद्यानिकेतन कुडित्रे.

बारावीच्या परीक्षांचे साहित्य केंद्रांवर गेल्या दीड आठवड्यापूर्वी पोहोच झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने परीक्षा होण्याबाबत अनिश्चितता आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने या कोऱ्या उत्तरपत्रिका त्याठिकाणी ठेवणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे बोर्डाने केंद्रांकडून हे साहित्य परत घेऊन स्वत:च्या स्ट्राँग रूममध्ये ठेवणे अधिक सुरक्षित होईल.

- पी. एस. जाधव, उपप्राचार्य, कमला कॉलेज.

दरवर्षी मुख्याध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य दहावी-बारावीचे परीक्षा साहित्य सांभाळतात. यंदा कोरोनामुळे वेगळी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील वर्गखोल्या सुरक्षित नाहीत. त्यामुळे बोर्डाने केंद्रांना पाठविलेले साहित्य पुन्हा आपल्या ताब्यात घ्यावे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा दिवस आधी ते पुन्हा केंद्रांना द्यावे.

- सुरेश संकपाळ, अध्यक्ष,

कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ.

आकडेवारी दृष्टिक्षेपात...

दहावीची विद्यार्थी संख्या : १३८४५९

मुख्य, उपकेंद्रांची संख्या : २४८६

बारावीची विद्यार्थी संख्या : १२११६९

मुख्य, उपकेंद्रांची संख्या : ९२५

Web Title: Burden of blank answer sheets of 10th-12th on schools; Headmaster's 'fever' increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.