दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा; मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:22 AM2021-04-22T04:22:57+5:302021-04-22T04:22:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पूर्वनियोजनानुसार दहावी, बारावीच्या परीक्षांच्या कोऱ्या उत्तरपत्रिका आणि अन्य साहित्य गेल्या दहा दिवसांपूर्वीच परीक्षा ...

Burden of blank answer sheets of 10th-12th on schools; Headmaster's 'fever' increased! | दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा; मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला !

दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा; मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पूर्वनियोजनानुसार दहावी, बारावीच्या परीक्षांच्या कोऱ्या उत्तरपत्रिका आणि अन्य साहित्य गेल्या दहा दिवसांपूर्वीच परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली असून बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागातील एकूण ३४११ केंद्रे असलेल्या शाळा प्रशासन आणि तेथील मुख्याध्यापकांना या कोऱ्या उत्तरपत्रिका आणि अन्य साहित्य सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानुसार बारावीची परीक्षा दि. २३ एप्रिल ते दि. २१ मे दरम्यान, तर दहावीची परीक्षा दि. २९ एप्रिल ते दि. २० मे या कालावधीत होणार होती. या परीक्षांसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण २,६१,९८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पूर्वनियोजनानुसार शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार विभागीय मंडळांनी गेल्या दहा दिवसांपूर्वी परीक्षा केंद्रांवर साहित्य पोहोचविले. दरवर्षी केवळ महिनाभर या कोऱ्या उत्तरपत्रिका, इतर साहित्य या केंद्र असलेल्या शाळांना सांभाळावे लागत होते. मात्र, यंदा हे साहित्य दीड ते दोन महिने सांभाळावे लागणार असल्याचे दिसते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमुळे बहुतांश शाळा बंद आहेत. शिक्षक, कर्मचारी शाळांमध्ये उपस्थित नाहीत. त्यामुळे या उत्तरपत्रिका, साहित्य सांभाळण्याचा धोका आहे. त्यामुळे एकप्रकारे या साहित्याचा शाळांवर बोजा पडला असून मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला आहे.

चौकट

हे साहित्य कस्टडीत...

कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅॅप, होलोक्रॉप्ट, स्टीकर, सिटिंग प्लॅॅन, विषय आणि माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य.

चौकट

परीक्षा कधी? पुढील प्रवेश कधी?

गेल्यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा वेळेत झाल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या परीक्षेचे निकाल जुलैमध्ये जाहीर झाले. त्यामुळे अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया लांबली. यंदाही कोरोना वाढू लागल्याने दहावीची परीक्षा रद्द झाली. बारावीची परीक्षा जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील प्रवेश परीक्षा कधी होणार, हा प्रश्नच आहे.

===Photopath===

210421\21kol_1_21042021_5.jpg

===Caption===

२१०४२०२१-कोल-ब्लँक ॲॅन्सरशीट डमी)

Web Title: Burden of blank answer sheets of 10th-12th on schools; Headmaster's 'fever' increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.