घरफाळा थकबाकीदाराच्या मिळकतीवर ३२ लाखांचा बोजा नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 10:48 PM2021-01-12T22:48:10+5:302021-01-12T22:49:48+5:30
Muncipal Corporation Kolhapur- घरफाळा थकबाकीदाराच्या मिळकतीवरच थकबाकी रकमेचा बोजा नोंद करण्याची कारवाई मंगळवारी महापालिकेने केली आहे. ३२ लाख ७६ हजार इतकी त्यांची थकबाकी होती. हा सर्व रकमेचा बोजा त्यांच्या मिळकतीवर नोंदविला.
कोल्हापूर : घरफाळा थकबाकीदाराच्या मिळकतीवरच थकबाकी रकमेचा बोजा नोंद करण्याची कारवाई मंगळवारी महापालिकेने केली आहे. ३२ लाख ७६ हजार इतकी त्यांची थकबाकी होती. हा सर्व रकमेचा बोजा त्यांच्या मिळकतीवर नोंदविला.
बेलबागेतील डॉ. नामदेव दादू भोसले यांच्या रि.स.नं. २८१३/१९ व आयसोलेश रोड जोतिर्लिंगनगर येथील डॉ. कौस्तुभ वसंत वाईकर रि.स.नं. ७०२/ १५ यांच्या वापरातील मिळकतीवर हा बोजा नोंदविला आहे. महापालिका घरफाळा विभागाकडून १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वसुली मोहीम सुरू आहे.
घरफाळा थकबाकीची रक्कम जमा न करणाऱ्यांवर जप्ती अथवा बोजा नोंद करण्याची कारवाई सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी महापालिकेत झालेल्या बैठकीवेळी घरफाळा घोटाळा आणि थकबाकीदारांविषयी प्रश्न उपस्थित केला होता.