आपटेनगर परिसरात घरफोडी, दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 17:47 IST2020-06-27T17:45:40+5:302020-06-27T17:47:02+5:30

आपटेनगर ते कणेरकरनगर या मार्गावरील बंद असलेले घर चोरट्यांनी फोडले. सोन्या-चांदीचे दागिने असा दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केला. उज्ज्वला संजीव कुरणे (वय ४४, रा. नक्षत्र हाइट्स, शिवाजी पार्क, कोल्हापूर, सध्या राहणार सांगोला, सोलापूर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Burglary in Aptenagar area, property worth Rs | आपटेनगर परिसरात घरफोडी, दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

आपटेनगर परिसरात घरफोडी, दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

ठळक मुद्देआपटेनगर परिसरात घरफोडीदीड लाखांचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूर : आपटेनगर ते कणेरकरनगर या मार्गावरील बंद असलेले घर चोरट्यांनी फोडले. सोन्या-चांदीचे दागिने असा दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केला. उज्ज्वला संजीव कुरणे (वय ४४, रा. नक्षत्र हाइट्स, शिवाजी पार्क, कोल्हापूर, सध्या राहणार सांगोला, सोलापूर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उपनगरातील बंद घरे चोरट्यांनी लक्ष्य केली आहेत. आपटेनगर परिसरातही अशा प्रकारे चोरीचा प्रकार वाढला आहे. आपटेनगर येथील उज्ज्वला कुरणे या कामामुळे सध्या सांगोला येथे राहतात. येथील घर बंद असते. २० जून रोजी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश करीत तिजोरीतील दीड तोळ्याचा नेकलेस, तीन तोळ्यांचे गंठण, कानातील टॉप्स असे पाच तोळे दागिने व इतर चांदीच्या वस्तू असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

२६ जून रोजी चोरीचा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल पाटील तपास करीत आहेत.

उपनगरांतील नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज

शहरात दाटीवाटीचा परिसर असल्याने नेहमी नागरिकांची वर्दळ असते. या उलट उपनगरांमध्ये शुकशुकाट असतो. याचाच फायदा चोर घेत आहेत. त्यामुळे परिसरात कोणी संशयित व्यक्ती फिरत असल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच पोलीस प्रशासनाला तत्काळ माहिती दिली पाहिजे.
 

Web Title: Burglary in Aptenagar area, property worth Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.