चंदुरात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:17 AM2021-07-12T04:17:04+5:302021-07-12T04:17:04+5:30

इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथील महासिद्ध मंदिरमागे असलेल्या एका घराचा कडी-कोयंडा उचकटून तिजोरीतील सोने-चांदी व रोख रक्कम असा ...

Burglary in Chandurat | चंदुरात घरफोडी

चंदुरात घरफोडी

Next

इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथील महासिद्ध मंदिरमागे असलेल्या एका घराचा कडी-कोयंडा उचकटून तिजोरीतील सोने-चांदी व रोख रक्कम असा एक लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. याबाबतची तक्रार सुशीला महादेव पुजारी (वय ५५) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सुशिला व त्यांचे पती हे घरातील बाहेरील खोलीमध्ये झोपले होते. यावेळी चोरट्यांनी बाहेरील खोलीच्या दरवाजाला दोरीने बांधून स्वयंपाकघरात प्रवेश केला. तेथे असलेल्या तिजोरीतून सोन्याची चेन, कर्णफुले, अंगठी, चांदीचे पैंजण व रोख रक्कम ३५ हजार असा एकूण एक लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. यानंतर घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, ते तेथेच घुटमळले.

Web Title: Burglary in Chandurat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.