‘जलाओ ऐसी शमा, के रोशनी औरों के काम आये

By Admin | Published: July 22, 2014 11:38 PM2014-07-22T23:38:14+5:302014-07-22T23:39:28+5:30

कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी : पै-पै साठवून १२३ कुटुंबीयांच्या जीवनात प्रकाश’

'Burn, such shama, the light of the others came in handy | ‘जलाओ ऐसी शमा, के रोशनी औरों के काम आये

‘जलाओ ऐसी शमा, के रोशनी औरों के काम आये

googlenewsNext

एम. ए. पठाण ल्ल कोल्हापूर
‘जिओ इस तरह की, जिंदगी औरों के काम आये। जलाओ ऐसी शमा के, रोशनी औरों के काम आये’ अशा विचारातून समाजातील गोरगरीब, विधवा, अनाथ व गरजू लोकांच्या जीवनात जगण्याची उमेद निर्माण करण्याचे काम कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी करीत आहे. गतवर्षी या कमिटीने प्रथमच सात लाख १९ हजार ३३५ रुपये जमा केले. अन् गरजंूना सात लाख सहा हजार ७२७ रुपये खर्च करण्यात आले. १२३ गरजूंंना याचा लाभ झाला.
मुस्लिम बांधव रमजान महिन्यात आपली जकात, फितरा गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. यासाठी समाजातील काही व्यक्ती, समूह कार्यरत आहेत. उलमा-ए-करात यांच्या मार्गदर्शनानुसार समाजातील लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, हा उद्देश घेऊन काही तरुण नि:स्वार्थीपणे एकत्र आले आणि त्यातून गतवर्षी कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी अस्तित्वात आली. मुस्लिम समाजातील बांधवांकडून दिलेली जकात, फितरा, सदका, आदी दिल्यानंतर ती गरजूंच्या हाती पडेल. त्याचा चांगला विनियोग होईल. त्याची दुआ मिळेल, हा उद्देश असतो. या उद्देशाला या विचाराने एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या कमिटीच्या माध्यमातून होत आहे.
गरीब, विधवांच्या घरी प्रत्येक महिन्याला काही ठराविक धान्य पोहोचविण्याचे काम होत आहे. अनाथ मुलीच्या लग्नातील खर्च, जे गरीब रुग्णालयात उपचार घेत आहेत त्याचा औषधोपचारांचा खर्च, शस्त्रक्रियांचा खर्च, आदी मदत करण्याचे काम कमिटी करत आहे.
कमिटीकडे गतवर्षी एकूण सात लाख १९ हजार ३३५ रुपये जमा झाले होते. यामध्ये जकात ३ लाख ५५ हजार ७२१ रुपये, इमदाद १ लाख ४८ हजार १७३ रुपये, सदका १ लाख ८६ हजार २३९ रुपये, फितरा २०० रुपये, फिदिया ३५०० रुपये, कफ्फारा १ लाख ५०० रुपये, बकरी ईदच्या बकऱ्यांच्या चमड्यांपासून १९ हजार ६३० रुपये, इतर ४,३७२ रुपये असे एकूण सात लाख १९ हजार ३३५ रुपये जमा झाले होते. समाजबांधवांनी गतवर्षी या कमिटीवर विश्वास दाखवत आपली जकात, फितरा, सदका, आदी जमा केला. हे समाजातील अनाथ मुले, विधवा, गरजू आई-वडिलांच्या वाईटवेळी उपयोगी पडले. त्यामुळे त्यांच्याकडून मिळणारी दुआ ही लाख मोलाची ठरणार आहे. समाजातील अशा अनेक प्रसंगातील गरजंूना मदत करण्यासाठी याहीवर्षी कमिटी निरपेक्ष, नि:स्वार्थी भावनेने जोमाने कामास लागली आहे. मुस्लिम बांधवांनी आपली जकात या कमिटीकडे अधिक जमा करण्याची गरज आहे. जेणेकरून समाजातील अधिक गरजवंतांना याचा लाभ होईल.
कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीचे सदस्य याही वर्षी जोमाने कार्यरत असून यावर्षी सर्वसाधारण १५ लाखाहून अधिक रक्कम जमा होईल असा विश्वास कमिटीच्या सदस्यांनी व्यक्त केला.

Web Title: 'Burn, such shama, the light of the others came in handy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.