शिवसेनेकडून कर्नाटकचे मंत्री रोशन बेगच्या प्रतिमेचे दहन
By admin | Published: May 25, 2017 02:37 PM2017-05-25T14:37:47+5:302017-05-25T14:37:47+5:30
मराठी माणसांवरील कुरघोडी थांबवा, अन्यथा कन्नडिगांची पळताभुई थोडी होईल : क्षीरसागर
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २५ : कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेगच्या वक्तव्याचा निषेध करीत शिवसेनेतर्फे कोल्हापूरात छत्रपती शिवाजी चौकात बेगच्या पुतळ्याचे गुरुवारी दहन करण्यात आले.
कर्नाटकचे नगरविकास मंत्री बेग यांनी कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्रचा नारा दिल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यामुळे सीमाभागात संतापाची लाट पसरली असून शिवसेनेने त्याचा निषेध केला आहे.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले. त्यांनी यावेळी जय भवानी, जय शिवाजी, अभिमानाची गोष्ट, जय महाराष्ट्र, रोशन बेगचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, कर्नाटक शासनाचा धिक्कार असो, यासह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी छत्रपती शिवाजी चौक परिसर दणाणून सोडला.
यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाषण केले. ते म्हणाले, जय महाराष्ट्र हे घोषवाक्य महाराष्ट्राची शान आणि मराठी माणसांच्या अस्मितेचे ब्रीद आहे. त्यामुळे कर्नाटक काय जगभराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मराठी माणसाला जय महाराष्ट्र म्हणण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कानडी सरकारकडून सीमा बांधवावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करु नये, मराठी माणसांचा अंत पाहू नका, अन्यथा कन्नडिगांची पळताभुई थोडी होईल, असा इशारा गुरुवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला.
यावेळी शिवसेनेचे दीपक गौड, संजय गांधी समितीचे अध्यक्ष किशोर घाटगे, जयवंत हारुगले, रणजित जाधव, विशाल देवकुळे, सुनील जाधव, दीपक चव्हाण, अमित चव्हाण, तुकाराम साळोखे, अजित गायकवाड, सुनील खोत, रमेश खाडे, विजय देसाई, युवा सेनेचे शहरप्रमुख चेतन शिंदे, पियुष चव्हाण, अविनाश कामते, माथाडी कामगार सेनेचे शहरप्रमुख राजू जाधव, गजानन भुर्के, शाम जाधव, सुनील भोसले, अश्विन शेळके, सागर घोरपडे, सुनील करंबे, राजू काझी, विनय वाणी, सचिन भोळे, कपिल सरनाईक, ओमकार परमणे, उदय भोसले, शिवाजी सावंत, महादेव पोवार, किरण पाटील, हर्षल पाटील, गजानन तोडकर, दिनेश साळोखे, सौरभ कुलकर्णी, यशवंत पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.