कोळवणच्या जंगलात बिबट्याला दहन; कोळवणच्या जंगलात मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:25 AM2020-12-31T04:25:58+5:302020-12-31T04:25:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी : कोळवण (ता. भुदरगड)च्या डोंगरावरील कात्याळावरील कड्याजवळ एक मृत बिबट्या सडलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत ...

Burning of leopards in the forest of Kolwan; Dead in the forest of Kolwan | कोळवणच्या जंगलात बिबट्याला दहन; कोळवणच्या जंगलात मृत

कोळवणच्या जंगलात बिबट्याला दहन; कोळवणच्या जंगलात मृत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी : कोळवण (ता. भुदरगड)च्या डोंगरावरील कात्याळावरील कड्याजवळ एक मृत बिबट्या सडलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत बिबट्यास वनविभागाच्या रेस्क्यू टीमने पंचनामा करून दहन केले. वृद्ध होऊन अथवा कोंळसिंडेच्या हल्ल्यात बिबट्या मृत झाल्याचे वनविभागातर्फे सांगितले.

भुदरगड तालुक्याच्या वाढत्या व विपुल जंगलात पट्टेरी वाघ, बिबट्या आदी प्राण्यांची संख्या वाढत आहे. गावाशेजारील पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान, सहा दिवसांपूर्वी कोळवणच्या जंगल हद्दीत सहा ते सात वर्षे वयाचा बिबट्या वाघ सडलेल्या अवस्थेत वनविभागास आढळून आला. पंचनाम्यात दिलेली माहिती अशी की, सदरचा बिबट्या सडलेला असून वर्ण पिवळसर तांबूस, अंगावर काळ्या रंगांचे ठिपके आहेत. त्याच्या नाकापासून शेपटापर्यंतची लांबी २२८ सेंमी भरली. उजव्या पायाची लांबी ४९ सेंमी भरली. पुढील डावा पाय ३७ सेंमी आढळून आला. मागील उजव्या पायाची लांबी ६५ सेंमी तर डावा पाय सडलेल्या अवस्थेत आढळला.

गेल्या आठवड्यापूर्वी ही घटना घडल्याचे वनविभागातर्फे सांगितले.

फोटो : कोळवण :

मृत व सडलेल्या बिबट्या वाघाचा पंचनामा करताना वनविभाग व डॉ. चिकोडे, किशोर आहिर,सचिन गुरव आदी

Web Title: Burning of leopards in the forest of Kolwan; Dead in the forest of Kolwan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.