पंचगंगा स्मशानभूमीत दहन, रक्षाविसर्जन एकाच दिवशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:23 AM2021-04-18T04:23:23+5:302021-04-18T04:23:23+5:30
कोल्हापूर: कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचे आकडे वाढत चालल्याने पंचगंगा स्मशानभूमीवरही अतिरिक्त ताण गृहित धरुन महापालिकेने दहन व रक्षाविसर्जन एकाच दिवशी ...
कोल्हापूर: कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचे आकडे वाढत चालल्याने पंचगंगा स्मशानभूमीवरही अतिरिक्त ताण गृहित धरुन महापालिकेने दहन व रक्षाविसर्जन एकाच दिवशी करण्याचे धोरण राबवले आहे. राखीव बेडपेक्षा कोरोनाग्रस्ताच्या प्रेतांचा आकडा दुप्पट झाल्याने कोणालाही फारवेळ प्रतीक्षा करावी लागू नये, असा यामागील हेतू आहे.
पंचगंगा स्मशानभूमीत दहन पारंपरिक पद्धतीने सरण रचून आणि आधुनिक पद्धतीने गॅस व डिझेल दाहिनीने होते. एकूण ४७ बेड येथे आहेत. यापैकी ६ बेड हे खास कोरोनाग्रस्तांच्या प्रेतांसाठी राखून ठेवले आहेत. महापालिकेचे २० कर्मचारी यासाठी काम करत आहेत. त्यांना पीपीई किट पुरवण्यात आले असून, प्रत्येक बॉडीला स्वतंत्र किट वापरला जातो. रोज ७ याप्रमाणे पीपीई किट पुरवली जाते.
कोरोनाने मृत्यू झालेल्याचा आकडा शुक्रवारी राखीव बेडपेक्षा दुप्पट झाला. कोल्हापूर शहरात मृत्यू झाल्यास पंचगंगा स्मशानभूमीतच आणले जात असल्याने १२ जणांचे दहन येथेच झाले. बेड इतर प्रेतासाठी उपलब्ध व्हावेत म्हणून दहन झाल्यावर लगेचच रक्षा घेऊन जाण्यास नातेवाइकांना सांगितले जात आहे. गॅस दाहिनीमध्ये दहन केल्यास तासाभराच्या आतच संबंधित नातेवाइकांना रक्षा हातात दिली जाते. कोरोनाने मयत झालेल्यांना प्राधान्याने गॅस दाहिनीत दहन केले जात आहे. मृत्यू वाढत असल्यानेच ही यंत्रणा वापरली जात असल्याचे महापालिकेचे आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे यांनी सांगितले.
कोविड रुग्णाचा शेवटचा प्रवास...
फोटो: १७०४२०२१-कोल-अंत्यसंस्कार ०१
फोटो: १७०४२०२१-कोल-अंत्यसंस्कार ०२
फोटो: १७०४२०२१-कोल-अंत्यसंस्कार ०३
फोटो: १७०४२०२१-कोल-अंत्यसंस्कार ०४
फोटो: १७०४२०२१-कोल-अंत्यसंस्कार ०५
फोटो: १७०४२०२१-कोल-अंत्यसंस्कार ०६
फोटो ओळ: कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत कोरोनाने मयत झालेल्यांवर सरणावर दहन व गॅस दाहिनी या दोन्ही प्रकाराने अंत्यसंस्कार करण्याचे काम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पीपीई किट घालून केले जात आहे. (सर्व छाया : आदित्य वेल्हाळ)