कुरुंदवाड येथे नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:28 AM2021-08-25T04:28:31+5:302021-08-25T04:28:31+5:30

मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शहरासह परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. यावेळी शहरातील शिवसैनिकांनी येथील ...

Burning of symbolic statue of Narayan Rane at Kurundwad | कुरुंदवाड येथे नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

कुरुंदवाड येथे नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Next

मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शहरासह परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटली.

यावेळी शहरातील शिवसैनिकांनी येथील आंबेडकर चौकात एकत्र येऊन राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी मंत्री राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला महिला कार्यकर्त्यांनी चप्पलाने मारहाण करत पुतळ्याचे दहन केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे, जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील, आण्णासो बिल्लोरे, मंगल चव्हाण, माधुरी टाकारे, रेखा जाधव, संतोष नरके, राजू बेले, मिलिंद गोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

फोटो - २४०८२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - कुरुंदवाड येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शहरातील शिवसेनेच्यावतीने डॉ. आंबेडकर चौकात मंत्री राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

Web Title: Burning of symbolic statue of Narayan Rane at Kurundwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.