शहर शिवसेनेतर्फे राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:29 AM2021-08-25T04:29:36+5:302021-08-25T04:29:36+5:30
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री राणे यांची जीभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर आरोप करताना घसरली. त्याचे पडसाद शहरात उमटले. शहर ...
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री राणे यांची जीभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर आरोप करताना घसरली. त्याचे पडसाद शहरात उमटले. शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत शिवाजी चौकात राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी मंत्री राणे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांवर जोरदार टीका केली.
उपशहरप्रमुख किशोर घाटगे म्हणाले, मंत्री राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल पंतप्रधानांनी आणि केंद्रांनी घ्यावी. मंंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी, अन्यथा गंभीर परिणाम होतील.
यावेळी शहरप्रमुख जयवंत हारुगले, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, राहुल माळी, योगेश चौगुले, पीयूष चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पुतळा दहनदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
फोटो : २४०८२०२१- कोल - शिवाजी चौक पुतळा दहन
कोल्हापुरातील शिवाजी चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा मंगळवारी शहर शिवसेनेतर्फे दहन करण्यात आला.